वैनगंगा नदीपात्रात निफंन्द्रा,अंतरगाव घाटातून अवैध रेतीचा उपसा, प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष!
आर्थिक देवाण-घेवानीमूळे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून निफन्द्रा, अंतरगाव घाटातून रात्रौ ला अवैध रित्या रेती उपसा सुरू असून नागरिकांनी तक्रारी करूनही महसूल व पोलीस प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
सावली तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रातील फक्त 3 घाटांचे लिलाव झाले मात्र अनेक घाट हे लिलाव होण्यापासून दूर आहे.याच संधी चा फायदा घेत या परिसरातील काही रेतीचोरट्यांनी तलाठ्याच्या माध्यमातून तहसील कार्यालयात सोबत संधान साधत रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेती उपसा केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एका ट्रॅक्टरमागे किमान 20 ते 30 हजाराची ‘एन्ट्री’ देऊनच अवैध वाहतूक सुरू आहे ठेवत असल्याचे कळते.यात काही प्रशासकीय अधिकारी यांचा सहकार्य असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
रात्रीच्या वेळी सततच्या वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य व आवाजाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.त्यामुळे हा अवैध बाजार थांबवा असे काही नागरिक तहसीलदार यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.“पाहणी करतो” एवढेच उत्तर मिळते, असा आरोप होत आहे.
ही होत असलेली अवैध रेती उपसा तात्काळ थांबवावा. हप्तेखोरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत असतांनाच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
- तलाठीच त्या माजी संचालक सोबत पार्टनर?
- निफन्द्रा येथील तलाठी यांच्या बाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे सदर तलाठी हा कार्यालयात केव्हाच मिळत नाही.तहसीलदार म्याडम बोलविले म्हणून हा नेहमीच बेपत्ता असतो. निफन्द्रा नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. यात एका पक्षाचे दोन माजी संचालक यांचा समावेश असल्याचे कळते मात्र या संचालक सोबत तलाठी हा पार्टनर असल्याचे बोलले जात आहे. एन्ट्री दिल्यानंतर भीती कशाची म्हणून रेती राजरोस सुरू आहे.एखादा गरीब शेतकरी काही घरकाम साठी रेती आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या वर गुन्हा दाखल करण्याची भाषा सुद्धा बोलले जाते असे नागरिकांचे म्हणणे आहे.








