घरकुल लाभार्थीना ‘मोफत रेती’ च्या नावाने अवैध रेतीचा बाजार? तहसीलदारांची मूक संमती?

394

सावली तालुक्यामध्ये वैनगंगा नदीच्या पात्रातून अनेक अवैध घाटांच्या माध्यमातून मोफत रेतीच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेतीच्या बाजार सुरू असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. या सदर प्रकरणाकडे स्थानिक तहसील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सावलीच्या तहसीलदारांची मुक संमती आहे का असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागलेला आहे.

सावली तालुक्यात वैनगंगा नदीचा पात्रातून मोठ्या प्रमाणामध्ये सध्या अवैध रेती ची उचल केल्याचे अनेक तक्रारी नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. मात्र सदर प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे.

सावली तालुक्यातील मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांना रेती अभावी घरकुल चे कामे बंद होती. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्यात यावी ही मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली तसेच शासनाने मोफत रेती देण्याच्या जीआर सुद्धा काढला मात्र सावली तालुक्यात मोफत रेती देण्यासंदर्भात प्रशासन हे नेहमीच दुर्लक्षित भूमिका घेतली. मात्र नागरिकांचा वाढता दबाव पाहता काही घाटातून घरकुल लाभार्थ्यांना मोफत टीपी देत असल्याचे सांगितले आणि याच संधीचा फायदा घेत प्रशासनातील संधी साधू व रेती तस्करांनी एकत्रित येत मोफत रेती चा नावाखाली अवैध रेतीचा बाजार सुरू केलेला आहे.’सावली तालुक्यात अंदाजे 7 ते 8 हजार मोफत टिपी चे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आहे.मात्र यातील बहुतांश टिपी ही अजूनही लाभार्थी कडे शिल्लक असल्याचे कळते आहे.मात्र नदी च्या घाटातून सर्वत्र उपसा बघता किमान 50 हजारहुन अधिक ब्रास रेतीचे उत्खनन केल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे.’ त्यामुळे यात कुणाकुणाच्या सहभाग आहे असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे.

वैनगंगा नदीचा पात्रातून सुरू असलेली पांढऱ्या सोन्याची लूट ही केव्हा थांबेल? असा प्रश्न सुद्धा नागरिकांना पडू लागलेला आहे. नदीपात्रातून सुरू असलेले उत्खननामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे सुद्धा पडलेले आहे तर अनेक रेती घाटातून नदीच्या पात्रात रस्त्यांची निर्मिती झाल्याचे चित्र सुद्धा समोर येत आहे.झोपेचे सोंग घेतलेल्या महसूल व पोलीस विभागांनी यावर कारवाई करतील का?असा प्रश्न नागरिक विचारले जावू लागले आहे.