वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातून अवैध रेतीच्या उपस्याने नदीकाठिल साडे बारा हजार केळीच्या झाडांची बाग पाण्याअभावी करपतेय

246

सावली तालुक्यातील बोरमाळा घाटातून रोज शेकडो ब्रास ची अवैध रेतीचे उत्खनन होत असल्याने पाण्याचा ठणठणाट झाला आणि काठावरील परिसरातील चार हेक्टर क्षेत्रात लावलेली केळीची बाग पाण्या अभावी करपत असून लाखो रुपयांचे नुकसान तरुण शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.

 

उद्योग विरहीत सावली तालुक्यात वैनगंगा नदी किनार पट्टीतील अंदाजे चाळीस ते पन्नास किलोमीटर चा सुपिक पट्टा असुन या भागात बागायती साठी पोषक वातावरण आहे.धान पिका व्यतीरिक्त बागायती मधील केळी पिकाची निवड करुन, विहीरगाव येथील समीर विलास घरत व विकास पुरेल्लीवार ह्या दोन युवा शेतक-यांनी मोठ्या हीम्मतीने नाविन्यपूर्ण प्रयोग हाती घेतला, जळगांव येथील जैन एरीगेशन कडुन साडे बारा हजार टिश्यु कल्चर रोपांची खरेदी करुन जवळपास पंधरा लक्ष रुपयांची मोठी गुंतवणूक केली.या प्रयोगातून जवळपास चाळीस लक्ष रुपयांचे उत्पन्न होईल अशी आशा होती. परंतु पाण्या अभावी स्वप्नाचा चुराडा होत आहे. ऑगष्ट महिण्यात लावलेल्या केळीची बाग जोमात आली व घड धरल्यानंतर पाण्याची आवश्यकता असतांनाच ऐन उमेदीच्या काळात वैनगंगा नदीचा पात्र कोरडा पडल्याने मोटार पंपां द्वारे पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अडचण निर्माण झाली, आहे.यापुर्वी नेहमी बोरमाळा बाजु कडील नदीच्या पात्रात मुबलक पाणी राहात असल्याने या शेतकऱ्यांनी साहस करुन चार हेक्टर जमीन भाड्याने घेऊन केळीची बाग लावली.परंतु पाण्या अभावी स्वप्न धुळीस मिटतील ही भीती निर्माण झाली आहे.याच परिसरात बोरमाळा वैनगंगा नदी घाटात गुणवत्तापूर्ण दर्जेदार रेतीचा साठा असल्याने मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होवुन पात्र खडकाळ होत असून पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

 

वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा करीत असल्याचे अनेकांनी तलाठी सह सावली तहसीलदार यांना माहिती दिली मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करीत राजरोसपणे उत्खनन करण्याचा सपाटा सुरू आहे.आमची सेटिंगच आहे अशी भाषा आता हे अवैध वाहतूक दार करीत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
संबंधित घाटावर नवनियुक्त जिल्हाधिकारी येऊन पाहणी करणार का? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे.