‘बँकिंग साक्षरता’ पुस्तकाचे पुणे येथे विमोचन सोहळा संपन्न

46

सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

ज्येष्ठ बँकिंग तज्ञ व सहकार क्षेत्रातील गाढे अभ्यासक
गणेशजी निमकर यांच्या “बँकिंग साक्षरता” या पुस्तकाचा विमोचन सोहळा पुणे येथील कॉसमॉस बँकेच्या सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. याप्रसंगी भारतीय रिझर्व बॅंकेचे संचालक मा श्री सतीशजी मराठे, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा डॉ उदयजी जोशी, महाराष्ट्र राज्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मा श्री अनिलजी कवडे, कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष व NAFCUB चे उपाध्यक्ष मा श्री मिलिंदजी काळे, बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह चे संस्थापक मा श्री राधेश्यामजी चांडक, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री व राज्य सहकार धोरण उच्चस्तरीय समितीचे सदस्य श्री विवेक जुगादे, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक फेडरेशनचे अध्यक्ष मा श्री अजयजी ब्रम्हेचा, सहकार सुगंधचे संपादक मा श्री भालचंद्रजी कुलकर्णी व पुस्तकाचे लेखक मा श्री गणेशजी निमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित “बदलते बँकिंग” या विषयावरील विशेष परिसंवादास उपस्थित मान्यवरांनी अनेक क्लिष्ट प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे दिलीत. यामध्ये राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे कार्य व तत्परता, सहकारी बँकांच्या संचालकांची दहा वर्षाची टर्म, राज्य सहकार धोरण तसेच कायद्यासंदर्भातील प्रश्न, बँक फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात येणारे कार्य, यासोबतच बुलढाणा अर्बन व कॉसमॉस बँकेची यशोगाथा या विविध विषयांवर संबंधित मान्यवरांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची अतिशय समर्पक अशी उत्तरे दिली.


पुस्तकाचे लेखक मा श्री गणेश निमकर यांनी या पुस्तकामध्ये बँकिंग साक्षरतेच्या सर्वच बाबींवर प्रकाश टाकला असून हे पुस्तक अतिशय आकर्षक व उपयुक्त स्वरूपाचे आहे. या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन