NMMS परीक्षेमध्ये शरदचंद्र पवार विद्यालय व्याहाड खुर्द चा मृणाल जवादे जिल्ह्यातून दुसरा

170

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील  शरदचंद्र पवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मध्ये  शैक्षणिक सत्र 2025-026 मध्ये घेण्यात आलेल्या NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना ) या परीक्षेमध्ये एकूण 29 विद्यार्थी पास झाले आणि त्यामधून 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र झालेले आहेत.यात  मृणाल दिपक जवादे ( G-2)
हा जिल्ह्यातून दुसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तर नैतिक बंडू चर्लावार ( G-14),नैतिक गजानन बाबनवाडे (G-41) कु. अनुश्री अमित भुरसे (G-65),आदित्य देवेंद्र बोरकुटे (G-80),कु. नव्या छत्रपती बोरकुटे (OBC-38), वीरेन दिवाकर नक्कावार (SC-8),कु. साक्षी ज्ञानेश्वर गेडाम (SC-29)

हे सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी वार्षिक 12000 रुपये प्रमाणे 4 वर्षाचे प्रत्येकी 48000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे

ही  विद्यालयासाठी विशेष अभिमानाची बाब म्हणजे मृणाल दिपक जवादे या विद्यार्थ्यांनी General Category मधून 138 गुण प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे तसेच त्यांनी बुद्धिमत्ता आणि विज्ञान या विषयात जिल्यातून प्रथम क्रमांकाचे गुण प्राप्त करून आमच्या विद्यालयाची मान उंचावलेली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आमच्या अंकुर बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे मान.अध्यक्ष साहेब, मान. सचिव साहेब आणि सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य मान.सुधीर  डी. जक्कुलवार सर मार्गदर्शक शिक्षक . आर. एम. जांभुळकर सर (बुद्धिमत्ता )  एम. डी. भुरसे सर (गणित /विज्ञान ) श्री. ए. एम. आत्राम सर ( सामा. शास्त्र ) विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.