नगरपंचायत ने ठराव नाकारला
सावली (सौरव गोहणे)
नगरपंचायत हद्दीतील योगी नारायण बाबा मठ परिसरातील खुली जागा सावली तालुका क्रीडांगणा करीता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी व लगतची जागा सुध्दा क्रीडांगणा करीता देण्यात यावी यासाठी समस्त सावली शहरातील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांनी तहसीलदार प्रांजली चिरडे सावली, मुख्याधिकारी नागरगोजे नगरपंचायत सावली, ठाणेदार प्रदीप पुल्लरवार पोलीस स्टेशन सावली,वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे वनविभाग सावली यांना दिनांक १२/०३/२०२५ रोज बुधवारला निवेदन देण्यात आले.यावेळी शेकडो युवा खेळाडू उपस्थित होते.
योगी नारायण बाबा मठ परिसर ( सर्व्हे नंबर (७९८) या जागेवर मागील ५ ते ६ वर्षापासून अनेक खेळाडू स्पर्धक इथे सराव करतात, सावली नगरपंचायत आणि सावली मित्रपरिवारा तर्फे विविध खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याच मैदानावर करण्यात आले. या मैदानाच्या माध्यमातून युवा वर्गाने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे या मैदानावर अनेक विद्यार्थी शारीरिक चाचणीची तयारी करून अनेक ठिकाणी नोकरी करीत आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणी याच मैदानावर सराव करतात म्हणून ही जागा सावली शहरात क्रीडांगणासाठी मिळावी असं सावलीतील क्रीडाप्रेमी आणि सावलीकरांना वाटते.

सावली नगरात क्रीडांगण व्हावे म्हणून ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी १२. ५० कोटी रुपये मंजूर केले, काही दिवसात कामाचे निविदा काढण्यात येणार. सावलीतील युवा वर्गाचा अधिकारी होण्याचे स्वप्नास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून या क्रीडांगणाची गरज आवश्यकता आहे ही सावलीवासीय जनतेची मागणी आहे.

हे निवेदन तहसीलदार सावली यांचे मार्फत जिल्हाधिकारी जिल्हा चंद्रपूर यांना पाठविण्यात आले सदर निवेदनाचा आर्त विचार करून सावली नगरपंचायत हद्दीतील क्रीडांगणासाठी योगी नारायण बाबा मठ परिसर लगतची (सर्व्हे नंबर ७९८) ही नियोजित जागा कुणालाही न देता ती कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यात यावी अन्यथा सावलीवासीय जनते तर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सावलीकरांनी दिला निवेदन देताना सावली नगरपंचायत चे पदाधिकारी,नगरसेवक,योग परिवार मित्रगण तसेच बॅट बिनटन,क्रिकेट युवा खेळाडू आणि सावली शहरातील युवक व नागरिक उपस्थितीत होते.

*बॉक्स*
नप ने ठराव नाकारला
सावली नगरपंचायत च्या मासिक सभेमध्ये विषय क्रमांक चार मध्ये शासकीय आदिवासी वस्तीगृहाला जागा देण्यासंदर्भाच्या असलेल्या ठराव आज नगरपंचायत च्या मासिक सभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने तो ठराव नामंजूर केलेला आहे.
शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृह उभारणी करिता मौजा सावली गट क्रमांक 798 एकूण आराजी 1.32 हेक्टर आर पैकी 1.32 हेक्टर आर वन क्षेत्र वळती करण्याचा प्रस्तावासह कोणतीही मान्यता न देता ठराव नामंजूर केलेला आहे.सावली शहराला क्रीडांगणसाठी या जागेशिवाय दुसरी जागा नसल्याने व क्रीडा प्रेमींची मागणी लक्षात घेऊन आज नगरपंचायत च्या मासिक सभेमध्ये ठराव फेटाळून लावण्यात आला.








