बाजार समिती लायसन्स नूतनीकरणाची सेसची रक्कम कमी करा

611

*सचिन तंगडपल्लीवार यांच्या मागणी यश*

सावली(सौरभ गोहणे)
सन 2025-26 या आर्थिक वर्षकरिता लायसन्स नूतनीकरण च्या वेळी सेस ची रक्कम वाढविण्यात आलेली आहे ती पूर्वी प्रमाणेच घेण्यात यावी अशी मागणी माजी संचालक सचिन तंगडपल्लीवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.त्यावरून सदर फी 10 हजार करण्याचा निर्णय हा प्रशासनाने घेतलेला आहे.

सावली कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उपबाजार व्याहाड खुर्द, पाथरी येथे मार्केट यार्ड (बाजारपेठ) सुरु नसल्याने तसेच स्थानिक व्यापारी खाजगी शेतमाल खरेदी करून मुल येथे विक्री करिता नेत असतात. अश्यावेळी सेसची रक्कम अदा करतात किंवा बाहेरील व्यापारी खरेदी करणे करिता येतात तेव्हा त्यांना शेतमाल विक्री करतात अश्या वेळेस खरेदीदार व्यापारी आपला नावाने NOC व रक्कम (सेस) भरणा करीत असतात. त्यामुळे काही व्यापाऱ्याची सेस भरणा केली दिसत नाही. त्यामुळे या वर्षी वाढविण्यात आलेली लायसन्स नूतनीकरणाची रक्कम 16500/- एवजी पूर्वी प्रमाणे 7500 /- रु. घेण्याल यावे अशी मागणी बाजार समितीचे माजी संचालक सचिन तंगडपल्लीवार यांनी प्रशासाकापुढे रेटून धरली. व्यापारी यांची मागणी लक्षात घेता 16500 ऐवजी 10000 करण्यात आले.याबद्दल प्रशासक तुपट यांचे सर्व व्यापारी यांनी आभार मानले.यावेळी माजी संचालक सचिन तंगडपल्लीवार, रवींद्र निकेसर, हेमंत देशमुख, संदिप वल्ल्वालवर लोमेश सातपुते,गणेश तीवाडे,भुवन सहारे,अनिल खाडकुरे,जगदीश चापले,राहुल पडगेलवार,दीपाली काटवले,उमाकांत चरडुके,, ,मनीषा चरलावार, दिलीप देशमुख,देवराव चिताडे, मनीष बद्दमवार,रवींद्र कोरडे,प्रभाकर रोहनकर यांच्या सह मोठ्या संख्येनी व्यापारी उपस्थित होते.