मूल येथे घरफोडी करून लाखोंची चोरी;सोन्याचे दागिने सह नगदी रक्कम ही पळविले

899

नागपुर येथे पद्मशाली समाजाचा उप वधु-वर मेळाव्यामध्ये गेलेल्या मूल येथील वार्ड क्रमांक 15 येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश चिप्पावार यांच्या घरी धाडसी चोरी झाली असून त्यात सोन्याच्या दागिने सह नगदी रोकड ही चोरट्यांनी पळविले.सदर घटनेची माहिती मूल पोलिसांना देण्यात आली असून पोलीस आपली तपास चक्रे फिरवत आहे.

 

आपल्या साळ्याच्या मुलाला मुलगी बघण्यासाठी मूल येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश नारायण चिप्पावार हे दि. 29/04/2026 ला सायंकाळी 5 वा घराला कुलूप लावुन मुल येथुन परिवारासह राजुरा येथे गेले. व मुक्काम करून दुसरे दिवशी 30/04/2026 ला नातेवाईकासह उप वधु वर मेळावा करिता नागपुर येथे जावून नागपुर येथुन राजुरा येथे रात्रौ परत गेले. घराला दोन दिवस कुलूप दिसतांना चोरट्यांनी आपला डाव साधला.मोठया सळाखी चा वापर करीत कुलूप तोडले.आणि आत मध्ये धुडघुस घालीत चोरी केली.

 

दि.1 मे ला राजुरा येथे साळीचे घरी हजर असतांना मुल येथे माझे घराचे शेजारील यांनी तुम्हचे घराचे गेटला कुलुप लावलेला दिसत असुन घराचे दार उघडा दिसत आहे असे सांगितले.त्यामुळे चिप्पावार परिवाराने त्वरित धाव घेतली आणि आले असता आलमारीमध्ये ठेवुन असलेले सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच किचन रूममधील भितीमध्ये असलेले आलमारी मधील घरगुती सामान सुदधा अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच किचन खोलीला लागुन असलेल्या खोलीमध्ये दोन लोखंडी आलमारीचे पल्ले उघडुन एका प्लास्टीक पन्नीमध्ये ठेवुन असलेल्या पर्समध्ये स्टिलचे डब्बामध्ये दहा ते पंधरा वर्षापुर्वी घेतलेले जुने वापरते सोन्याचे दागिने 5 तोड्याचे 2 बांगळ्या त्यावेळेसची अंदाजे किमीत 1,00,000/- रूपये,,साडेतीन तोडयाची काळे मणी ओवुन असलेली सोन्याची पोत अ.कि. 70,000/- रूपये,, दीड तोड्याचा गोफ अ. कि. 30,000/- रूपये , 04 ग्रॅम अंगठी अ. कि. 10,000/-रूपये तसेच लाकडी टेबल आलमारीचे खालचे खाण्यामध्ये एका प्लास्टीक डब्ब्यामध्ये ठेवुन असलेली जुनी लग्नाचे वेळी घेतलेली काळया मण्याची गळसोरी त्यामध्ये असलेले दीड ग्रॅम डोरला अ.कि. 5,000/-रूपये तसेच 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बारीक मणी कि.अ.2,000/- रूपये असा एकूण 2,17,000/- रूपयाचा सोन्याचे दागिने व रोख रक्कम 10,000/- रूपये दिसुन आले नाही. तसेच तेव्हा मी सोन्याचे दागिन्याचा तसेच रोख रकमेचा घरी अस्ताव्यस्त टाकुन असलेल्या सामानामध्ये शोध घेतला असता दागिने तसेच रोख रक्कम मिळुन आले नाही.सोनेची आजचे बाजारमूल्य हे लाखोंच्या घरात असून 15 हुन अधिक तोडे सोने व रोख रक्कम असे एकूण 20 लाखाहून अधिकची चोरी झालेली आहे.

सेवानिवृत्त प्रकाश चिप्पावार यांची पत्नी अंगनवाडी शिक्षिका शोभाताई चिप्पावार या आहेत घटनास्थळी पाहिल्या बरोबर त्यांना रडू कोसळले. एक एक पै पै जमा करून जमा केलेली पुंजी ही चोरट्यांनी पळविल्याने त्यांनी हंबरडा फोडला.या चोरीच्या घटनेने सर्वत्र दहशत पसरली असून या चोरट्यांचा लवकरात बंदोबस्त करावा व वस्तू परत मिळवून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सदर घटनेचा तपास मुल पोलीस करीत आहे.