पीएम श्री जीप शाळेत समर कॅम्प उत्साहात संपन्न
सावली पीएमश्री जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, सावली क्र. १ येथे दि. २ मे ते ६ मे २०२६ या कालावधीत आयोजित पाच दिवसीय समर कॅम्प उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सर्जनशील व क्रीडा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रयोग, वाचन-लेखन कौशल्य विकास,योगा, कराटे तसेच विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.

कॅम्पच्या समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनास पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

समारोप कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. शामल तोटावार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रमाकांत बुरीवार तसेच शिक्षकवृंद व समिती सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
सदर समर कॅम्प शाळेसाठी यशस्वी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शाळेतर्फे सांगण्यात आले.








