क्रीडांगणासाठी योगी नारायण बाबा मठ परिसर, लगतची (सर्व्हे न. ७९८) हीच नियोजित जागा राखीव ठेवा ;क्रीडा प्रेमींची मागणी;अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

598

सावली नगरपंचायत हद्दीतील संत योगी नारायण बाबा मठा परिसरात असलेली भव्य खुली जागा क्रीडांगणा करिता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी व लगतची असलेली जागा सुद्धा क्रीडांगणा करता देण्यात यावी अशी मागणी सावली येथील शेकडो क्रीडा प्रेमींनी व्यक्त केली असून ही जागा इतरत्र कोणाला दिल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सावलीतील क्रीडा प्रेमी ने दिला आहे.

योगी नारायण बाबा मठ परिसर, लगतची (सर्व्हे न. ७९८) या जागेवर मागील पाच ते सहा वर्षापासून अनेक खेळाडू, स्पर्धक इथे सराव करतात, सावली नगर पंचायत तसेच सावली मित्रपरिवारातर्फे विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याच ग्राउंडवर केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले ग्राउंडचा उपयोग करतात, त्यात लहान तरुण व प्रौढ व्यक्ती अनेक खेळाचा उपयोग या ग्राउंडवर करतात करिता या जागेची सावली शहरातील व तालुक्यातील शिकणाऱ्या विध्यार्थी व विध्यार्थीनिंना सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो, या ग्राउंडच्या माध्यमातून युवा वर्गाने अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आहे, सदर क्रीडांगावरून अनेक विध्यार्थी शारीरिक चाचणीची तयारी करून अनेक ठिकाणी नौकरी करीत आहेत व सुशिक्षित, बेरोजगार, तरुण-तरुणी, याच क्रीडांगनाचा उपयोग करतात. म्हणून हि जागा सावली शहरात क्रीडांगासाठी मिळावी, असे आम्हा सावलीकरांना वाटते.


सदर जागेची मागणी आदिवासी वसतिगृह निर्माण करण्यासाठी तालुक्यातील आदिवासी बांधव क्रिडांगणाच्या जागेची मागणी केली आहे, आणी चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री व तहसीलदार सावली यांना क्रिडांगणाच्या जागेची केली आहे. सावली नगरात क्रिडांगण निर्माण व्हावेत म्हणून आमदार विजय वड्डेटीवार यांनी 12.50 कोटी रुपये मंजूर केले. काही दिवसात कामाचे टेंडर सुद्धा काढण्यासाठी दिले. आणी आता सावली शहरात क्रिडांगणा ऐवजी आदिवासी वसतिगृह निर्माण होण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आणी असे जर झाले तर सावली शहरातील गुणवंत खेडाळूना खेळण्याकरिता कोणतेही क्रिडांगण उपलब्ध राहणार नाही.

सावलीतील युवा वर्गाचा अधिकारी होण्याचा स्वप्नास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये करिता या क्रीडांगणाची आवशकता आहे. हि सावली वासीय जनतेची मागणी आहे. सदर निवेदनाचा आर्त विचार करून सावली नगरपंचायत ह‌द्दीतील कीडांगणासाठी योगी नारायण बाबा मठ परिसर, लगतची (सर्व्हे न. ७९८) हीच नियोजित जागा कुणालाही न देता ती कायमस्वरूपी क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यात अन्यथा सावली वासीय जनतेतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी व क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावे असे आवाहन करीत तहसीलदार सावली, मुख्याधिकारी, न.प. सावली, ठाणेदार, पोलीस स्टेशन सावली. वनाधिकारी वनविभाग सावली यांना उद्या दिनांक 12 मार्च ला सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात येणार आहे.

बैठीकीत इशारा

क्रीडांगण संदर्भात सावली तालुका पत्रकार भवन येथे आज दिनांक 11 ला सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली.या बैठकीला नगरसेवक, पत्रकार, व्यापारी तसेच खेळाडू उपस्थित होते.कोणत्याही परिस्थितीत क्रीडांगण ची जागा जैसे थे असली पाहीजे अन्यथा प्रशासनाला जागे करण्यासाठी जर आंदोलनाची गरज भासली तर तेही करू असा इशारा यावेळी खेळाळू नी दिला आहे.