- वाहन चालक मालकांच्या असलेल्या समस्या कडे दुर्लक्ष करू नका तर आम्हालाही न्याय द्या या मागणी साठी जय संघर्ष वाहन-चालक मालक संघटना सावली च्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सावली तहसीलदार यांच्या मार्फतीने देण्यात आले.
या निवेदानात त्यांनी म्हटले की,
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात योजना देश पातळीवर लागू करण्यात यावी. कारण सदरील योजनेचा महाराष्ट्रातील प्रवाशांना देशातील इतर राज्या मध्ये लाभ मिळत नाही. त्यामुळे इतरही राज्यात हि योजना लागू करण्यात यावी.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वाहन कर जास्तीचा आहे. तो कमी करण्यात यावा. दलित आणि आदिवासी प्रमाणे वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा करण्यात यावा. कारण नुकतेच पाश्चिम बंगाल मध्ये आपल्या टाकळीभान अहमदनगर येथील वाहन चालकास जमावाने बेदम मारहाण करून जिव घेतला. कधी गाडी मालक ड्रायव्हरला मारहाण करतो तर कधी टोल नाक्या वरील कर्मचारी मारहाण करतात तर कधी वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी देखील हात साफ करून घेतात. या सर्वांना आळा बसण्यासाठी ड्रायव्हर सुरक्षा कायदा होणे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच आपल्या महाराष्ट्र राज्या मध्ये शासनाच्या माध्यमाने एस. टी. च्या प्रवासात शालेय विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच महिलांना सरसकट अर्धा टिकीटाची सवलत देऊन टॅक्सी व्यवसायिकाचे पूर्णता कंबरडे मोडले आहे. तरी पण आपल्या राज्या मध्ये इतर राज्यांच्या तुलनेत रोड टॅक्स, व्यवसायकर हे जास्तीचे आहेत.
वरील मागण्याचे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी चे सुधीर टोंगे, महाराष्ट्र प्रदेश प्रचार प्रसार प्रमुख,
उमेश आजबले, चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष, रवि झरकर
चंद्रपुर जिल्हा सह कोषाध्यक्ष, राजु देशमुख सावली तालुका अध्यक्ष एकनाथ ठाकुर ,मुकेश भुरसे,खुशाल हुलके ,मंगेश शेट्टे,लखन परोते यावेळी उपस्थित होते.








