ब्रेकिंग न्यूज…सावली वनपरिक्षेत्रात हत्तीचा कळप घुसला;शेतपिकांची नुकसान करायला सुरुवात

3359

शेत पिकाच्या नासाळीने बळीराजा धास्तावला

 

गडचिरोली जिल्ह्यातील वसा, पोर्ला,सखरी, काटला, कुरखेडा,सेमाना वाकडी परिसरात दहशत माजवून शेतीचे नुकसान करणाऱ्या हत्तीचे कळप वैनगंगा नदीतुन व्याहाड बुज परिसरातील वाघोली बुट्टी आणि सामदा या गावात 30 सप्टेंबर ला रात्रौच्या सुमारास दाखल झाले. जवळपास 25ते 30 हत्ती चा कळप असल्याची माहिती आहे.सामदा मार्गे व्याहाड -कापसी मार्गांवर आपले प्रस्थान करतांना जंगली हत्त्याच्या समूहाने वाटेत येणाऱ्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर त्यांनी आपला समूह कापसी -पेठगांव परिसरातील जंगलाकडे वळवीला असून परिसरातील जनतेसह शेतकरी वर्गात धास्तीचे वातावरण आहे.

व्याहाड बुज हे गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वैनगंगा नदीच्या ऐल तिरावर असून पैल तिरावर गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी सेमाना गावात धुडगूस घातल्यानंतर वैनगंगा नदी ओलांडून हत्तीच्या कळपाने व्याहाड बुज परिसरात काल रात्रौ प्रवेश केला .

 

ऐन हातात येणाऱ्या पिकावर गजराजाच्या कळपाच्या पावलांचे ठसे पडल्याने अनेक शेतकऱ्याचे पीकांची नासाडी झाली असून आणखी किती नुकसान होणार?या भीतीने परिसरातील शेतकरी धास्तवला आहे तर वनविभागाचे कर्मचारी हत्तीच्या कळपास आपल्या क्षेत्रातून बाहेर कसे काढता येणार या प्रयत्नात रात्री चा दिवस करीत आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या व्याहाड बुज गावाच्या सीमेला लागून वैनगंगा नदी आहे तर नदीच्या पलीकडे गडचिरोली जिल्ह्याची सीमा सुरु होत असून गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जंगली हत्तीच्या कळपाने उच्छाद मांडून धान्य पीक तसेच शेतीत लावलेल्या भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान केले. असल्याचे वृत्त वर्तमान पत्र तसेच सोशल मीडिया वर झळकत होते. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीच्या तिरावरून हत्तीचा कळप कधीतरी व्याहाड बुज परिसरातील गावात दाखल होणार असल्याची कुणकुण वनविभागाला लागली असल्याने वनविभागाचे कर्मचारी वैनगंगा नदी किनारी गस्तीत होते. परंतु हतीच्या कळपाने वनविभागाची गस्त चुकवत अखेर व्याहाड बुज परिसरातील वाघोली बुट्टी आणि सामदा गावातील शेत शिवारात प्रवेश केला.

मागील वर्षी ही ऑगस्ट महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या कळपातून वाट चुकलेल्या हत्तीने वैनगंगा नदी ओलांडून व्याहाड बुज परिसरातील गावात प्रवेश केला होता. त्यावेळी व्याहाड, सामदा, हराम्बा आणी परिसरातील बऱ्याच गावातील शेतीचे नुकसान केले होते. आता मात्र हत्तीचा कळपाचेच आगमन झाल्याने व्याहाड बुज परिसरातील शेतकऱ्यांना किती नुकसान सोसावे लागणार व वनविभाग हत्तीच्या कळपाची परिस्थिती कशी नियंत्रणात आणणार या कडे शेतकऱ्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.

सावली वनपारिशेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड बुज, डोनाळा, उपरी, शिर्शी या परिसरारत आधीच वाघाने दहशत मांडली असून मागील महिन्यात 2 इसमाचे बळी घेतल्याची घटना घडली होती. अजूनही त्या नरभक्षक वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही.आधीच वन्यप्राण्याच्या हल्ल्याच्या भीतीचे सावट जनतेसह शेतकऱ्यावर असताना पुन्हा याच परिसरात हत्तीच्या कळपाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यासह जनतेत भीतीयुक्त वातावरण असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

हत्तीचा कळप आल्याची माहिती वनविभाग ला मिळाली आम्ही सर्व जण त्यांच्या वर पाळत ठेवून आहोत–विनोद धुर्वे,वनपरिक्षेत्र अधिकारी सावली

 

*वैनगंगा नदीतून हत्तीचा कळप माझ्या शेतातून गेल्याने 3 एकर चे पीक पूर्णतः गेले असून प्रशासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी व हत्तीचा बंदोबस्त वनविभागाने त्वरित करावे*
रुमाजी कोहळे,शेतकरी,सामदा

*”व्याहाड बुज परिसरात दाखल झालेल्या हत्तीच्या समूहाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानी वनविभागाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी”*
कविता बोल्लीवार
सरपंच व्याहाड बुज.

*”व्याहाड बुज परिसरतील बळीराजा वर नैसर्गिक संकटासह वन्य प्राण्याच्या भीतीची मालिका अविरत सुरु असून प्रशासनाने वेळीच वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा”*
भाऊराव कोठारे
अध्यक्ष संताजी सोशल फॉउंडेशन
सावली

*”सावली तालुक्यात वन्य प्राणी व मानवी जीवन यांचा संघर्ष शिघेला पोहचला असून वनविभागाने जनतेच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाय योजना कराव्या. “*
सुनील बोमनवार
अध्यक्ष, श्री किसान भात गिरणी मर्या. व्याहाड बुज.