शेतात फवारणी गेलेल्या युवा शेतकऱ्यांच्या विद्युत शॉक लागून मृत्यू

339

सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील रोहित रवींद्र ढोले वय 28 वर्ष हा आज दिनांक 9 मे ला सकाळी 9 च्या सुमारास आपल्या शेतात फवारणी करता गेला असताना शेतात कुणीतरी अद्यात व्यक्तींनी लावून ठेवलेल्या कुंपण ताराला स्पर्श झाल्याने सदर शेतकऱ्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती गावात मिळताच गावकरी सदर घटनास्थळी पोहोचले घटनेची माहिती पोलीस स्टेशन पाथरी यांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलेला आहे. युवा शेतकऱ्यांच्या मृत्यूने पेंढरी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.मृतक शेतकऱ्याच्या मागे आई,वडील,पत्नी व 2 वर्षाचा मुलगा आहे.