शाळेला दोन शिक्षक आणि त्यातील पुन्हा एका शिक्षकाची बदली केल्याने संतप्त पालकांनी शाळेत जावून मुख्याध्यापक यांना पत्र दिले आणि विद्यार्थ्यांना घरी घेवून गेल्याची घटना आज सावली तालुक्यातील रयतवारी येथे घडली.

सावली पंचायत समिती अंतर्गत जाम रयतवारी येथे वर्ग 1 ते 4 आहे.या ठिकाणी 4 शिक्षकांची आवश्यकता असतांना फक्त दोनच शिक्षक आहे.यातच चुनारकर नामक शिक्षकाला व्याहड खुर्द येथे पाठविण्यात आले अशी माहिती आज पालकांना मिळाली.त्यावरून सर्व पालक एकत्र येत झालेली बदली रद्द करा आणि किमान 2 तरी शिक्षक असू द्या असे सांगून मुख्याध्यापक यांना पालकांनी पत्र दिले व एक शिक्षक कुठे लक्ष देईल म्हणून सर्व विद्यार्थ्यांना घरी घेऊन आले.जो पर्यंत शिक्षक ची पूर्णनियुक्ती होत नाही तो पर्यंत विद्यार्थी पाठविणार नाही पवित्रा पालकांनी घेतलेले आहे यावेळी मोठ्या संख्येने पालकावर्ग उपस्थित होते.








