तालुक्याशी अनेक गावाचा तुटला संपर्क ; शिक्षण व शासकीय कामाकरिता मोठी समस्या…

1007

 

 

सावली तालुक्यात मागील 8 दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे नदीला पुर आल्याने व गोसेखुर्द बांधाचा पाणी सोडल्यामुळे  तालुक्यातील अनेक मार्गावर पुरस्थिति निर्माण झाल्यामुळे तालुक्याशी अनेक गावांचा संपर्क तुटलेल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कामाकरिता जाण्यास व  खेड्यागावातील विद्यार्थ्यांना शिक्षणा करिता सावली येथे ये- जा करण्यास तर सामान्य जनतेला शासकीय काम करण्यास मोठी लोकांना समस्या निर्माण झालेली आहे.
अनेक गावाचा तालुक्यासी संपर्क तुटल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून पर्यायी मार्ग हा जंगल व्याप्त असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या झड़पटीच्या भिट्टी पोटी प्रवास करतांना जीव हातात घेऊन प्रवास करावा लागतो.

तालुक्यातील अनेक गावातील घरांची झड़पत :

सतत होणाऱ्या पाऊसामुळे तालुक्यातील अनेक घरांची झड़पत होऊन नुकसान झालेली असल्यामुळे अनेक कुटुंबांना बेघर झाल्याने जनतेकडून झड़पट झालेल्या घरांचा पंचनामा करुन लवकरात लवकर मदत मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.

तालुक्याशी जोडलेल हे मार्ग आहे बंद :

सावली तालुक्यातील साखरी – सावली,
सावली – चारगाव, सिंदेवाही – पाथरी, जाम – केरोडा, सावली – जिबगाव काल रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ते बंद झालेले आहे.
सदर मार्गाने प्रवास बंद असल्यामुळे प्रवास करण्यास मनाई असल्यामुळे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सज्ज आहे.