सुनील बोमनवार यांचा नवभारत नवराष्ट्र च्या वतीने जिल्हा भूषण पुरस्काराने सन्मान

691

 

 

दैनिक नवभारत-नवराष्ट्र ग्रुपतर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा असा जिल्हा भूषण पुरस्कार सोहळा चंद्रपूरातील राधाकृष्ण सेलिब्रेशन येथे बुधवारी पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात *व्याहाड बुज येथील सुनील बोमनवार* यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते जिल्ह्यातील गणमान्य अतिथीच्या उपस्थितीत जिल्हा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सुनील बोमनवार यांच्या कार्याची पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उजळणी होताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुधाकर अडबाले यांनी सुनील बोमनवार यांच्या बद्दल गौरवउद्गार काढून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यांच्या या पुरस्कारा बद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून सावली तालुका पत्रकार संघाने त्यांचे अभिनंदन केले आहे.