चांदलीत पोहचली बस;प्रवाशी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद

1985

चांदली बूज या गावात गडचिरोली – सावली – खेडी – चांदली बूज ते मूल ही बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी सरपंच विठ्ठल येग्गावार व ग्रामस्थांनी केली होती तसेच पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व गडचिरोली आगार प्रमुख राखडे यांना पत्रव्यवहार केला होता.

विद्यार्थी यांना सावली येथे शिक्षणात येण्यासाठी अनेकदा अडचण निर्माण झाली होती तसेच प्रवाशींना सुद्धा सावली तसेच मूल जाण्यासाठी अडचणी होत्या त्यामुळे बस सुरू करणे हे नितांत आवश्यकता होती.ही अडचण लक्षात घेता सरपंच विठ्ठल येग्गावार हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.अखेर आज गडचिरोली आगार प्रमुख यांनी बस सेवा उपलब्ध करून दिल्याने चांदली वासीयांनी आनंद व्यक्त केले.


गावात पहिल्यांदा बस आल्याने बस ची पूजा करून हार लावण्यात आला व स्वागत करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित गावचे सरपंच विठ्ठल मल्लाजी येग्गावार ,ग्रामसेवक आशिष शंकरराव आकनुरवार, गावचे पोलीस पाटील चिंतामण पोचुजी बालमवार, ग्राम पंचायत सदस्य सौ. जयश्रीताई अमोल जोनमवार, सौ. योगिताताई नरेंद्र संतोषवार, सौ. निताताई व्यंकटेश उईके, सौ गोपिकाताई विलास गोपेवार, सीताराम मोरेश्वर कोडापे,म.गा.तंटा मुक्त अध्यक्ष राकेश हरिभाऊ गुंडावार सामजिक कार्यकर्ता सौ. शिलाताई गुरनुले , ग्राम पंचायत कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

असे आहे बस चे वेळापत्रक
१)गडचिरोली-चांदली-मूल
११.००,
२)गडचिरोली-हरांबा-चांदली-मूल १६.०० ही बस सावली वरून १७.३० ला निघेल
३) मूल- चांदली-गडचिरोली ६.१५,११.४५,१८.००
४) मूल-चांदली-हरांबा-गडचिरोली
८.३०