पावसाने केला कहर ;पेंढरी मक्ता येथे 5 जणांचे घरे पडली

664

पेंढरी मक्ता(सुरेश ढोले) सावली तालुक्यात सद्या गेल्या आठवड्याभरापासून सतंधर पावसाने कहर करीत असून सावली तालुक्यात शेकडो घरांची पडझळ झाल्याची माहिती पुढे येत असून पेंढरी मक्ता येथे पाच नागरिकांचे घरे पडली आहे आहे.

बाळकृष्ण गावळे, देवराव शेडमाके,रामचंद्र शेंडे,नेताजी गावळे,मधुकर मडावी सतत च्या पावसाने या ग्रामस्थांच्या घराची भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.तसेच घरातील मोठ्या प्रमाणात सामान व अनाज ची नुकसान झाले आहे.त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामा करून त्यांना मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या पावसामुळे नदी,नाले,तलाव,बोळी या पूर्णतः भरलेले असून शेतात पाणी साचून आहे त्यामुळे अनेक शेतकर्यांचे धानाचे परे व कापसाची लागवडीतील रोपे हे सडण्याच्या मार्गावर आहे.