दाबगाव घाटातून जवळपास तीन हजार मोफत टिपी वर एक लाखाहून अधिक ब्रास रेती ची उचल!

307

सावली तालुक्यातील वैनगंगा नदीचा काठावर असलेल्या दाबगाव घाट सध्या हा अवैध रेती चोरांसाठी नवसंजीवनी झालेला आहे.याच घाटावरून अनेक घरकुल लाभार्थ्यांना मोफत टीपी देण्यात आलेले आहे. याच मोफत टिपीचा फायदा घेत सेटिंग असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी घेत हजारो ब्रास रेतीची उचल केल्या जातआहे. या घाटातून जवळपास एक लाख ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करण्यात आले असल्याचे प्रत्यक्ष स्थळावरून दिसते आहे. सदर घाटावर फक्त दोन हजार दोन ते तीन हजार लाभार्थ्यांना मोफत रेतीचे टीपी देण्यात आले होते. मात्र याच संधीचा फायदा घेत महसूल कर्मचाऱ्यांशी संधान साधत रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ लावलेला आहे.आणि आता तर त्याच परिसरातील रेतीचा साठा ही संपत असल्याची पुढे येत आहे.

सावली तालुक्यातील विरखल, हिरापूर ,चीचबोडी,मोखाडा,बेलगाव, थेरगाव, निमगाव ,राजोली नवेगाव, पाथरी ,करगाव या ठिकाणच्या घरकुल लाभार्थ्यांना सदर घाटावरून रेती आणण्यासाठी मोफत टीपी प्रदान करण्यात आले होते. मात्र याच मोफत टीपीचा फायदा घेत रात्र दिवस रात्र मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून शासनाच्या लाखो रुपयांना चुना लावलेला आहे. एकीकडे शासन महसूल जमा करण्यासाठी अनेक प्रयत्नांचे पराकाष्ठा करीत आहे.छोटे छोटे दाखला मिळविण्यासाठी महसूल ची पावती म्हणून पैसे घेतले जाते. असे असतानाच सावली तालुक्यातील महसूल अधिकारी मात्र त्याला बगल देत असून वैयक्तिक महसूल कसा वाढेल याकडे स्वतः लक्ष देत असल्याचे दिसत आहे. या संपूर्ण घटनाकडे सावलीच्या तहसीलदार यांचे दुर्लक्ष हे अर्थपूर्ण असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. या अर्थपूर्ण सेटिंग मुळेच सध्या अवैधरीत्या रीती तस्करांचे चांगभलं झालेले आहे. या रेती तस्करांच्या मुजोरीपणाचा त्रास सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसभरात निवडक रेतीचे ट्रॅक्टर हे लावले जातात मात्र रात्रभर जेसीपी च्या साहाय्याने रेती काढली जातात. रेतीचे वाहतूक करताना अनेक ट्रॅक्टर वाले आपले गाडीचे लाईट बंद करून रात्री बेभान वाहने चालवतात मात्र सावली व पाथरी पोलीस विभाग सुद्धा यांच्या दुर्लक्ष होताना दिसत आहे. सदर वाहतुकीचा परिणाम हा सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.

रेती ची वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्याचे नंबर प्लेट नाही.तसेच त्यांच्या गाड्याचे इन्शुरन्स नाही,पियुसी नाही.अनेक चालकांकडे तर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नाही.तसेच मोठ्या प्रमाणात ड्रायवर हे ‘जागरण डोज’ म्हणून दारू पिऊन राहतात. या सर्व बाबीकडे सावली पोलीस स्टेशन व पाथरी पोलीस स्टेशन चे अधिकारी व पोलीस हे डोळेझाक करीत असल्याने अर्थपूर्ण सेटिंग मध्ये यांचाही सहभाग तर नाही ना?असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू लागलेला आहे.

त्या घाटाची चौकशी करा….
या घाटावरून मोफत रेती आणण्यासाठी जर टिपी ची संख्या कमी असेल आणि प्रत्यक्षात उत्खनन जात असेल तर मग हे रेती चोर कोण? आणि कुणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे.त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी तसेच ड्रोन द्वारे वैनगंगा नदीचे उत्खनन झालेल्या भागाची मोजणी करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.या संदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्यांनी एक पत्र वरिष्ठांकडे पाठविले असल्याची माहिती मिळाली आहे.