चार महिन्यातच कोरेगाव भीमा जयस्तंभ चे काम उखडले
बांधकाम विभागाचा निकृष्ठ कामाचा नमुना
सावली येथे नगरपंचायत अंतर्गत पर भाग 2 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौका मध्ये कोरेगाव भीमा जयस्तंभ ची प्रतिकृती तयार करण्यात आली.यासाठी लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. मात्र चार महिन्याच्या कालावधी मध्येच निकृष्ट काम समोर आले आहे.या कामातील स्टाईल ही पडलेली असल्याचे दिसत आहे.तसेच काही ठिकाणी लावलेली स्टाइल सुटत असल्याचे दिसते.या करिता वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक ची उपकरणे निकृष्ठ आहे.सद्या बंद झाले.म्हणजे एकीकडे लाखो रुपये खर्च करून स्मृती जागविण्यासाठी काम करायचे आणि दुसरीकडे निकृष्ठ काम करून मलिंदा खायचा हा प्रकार निषेधार्थ असून
निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार व बांधकाम अभियंता यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









