सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

82

शेतकऱ्यांना त्रास होणार नाही असे कार्य करावे- कृषी अधिकारी ललित राऊत यांचे केंद्र संचालक सूचना

सावली तालुक्यातील  सर्व कृषि केंद्र संचालकांची नुकतीच पंचायत समितीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात सभेभेचे आयोजन कृषि विभागाचे वतीने करण्यात येऊन कृषि केंद्राचे कायदेशीर संचालन बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी गूण नियंत्रण निरीक्षक कृषि अधिकारी दिनेश पानसे यांनी सर्व कृषि केंद्र धरकांना वेळेत परवाना नूतनीकरण करणे व दर्शनी भागात प्रदर्शित करणे, साठा फलक व दरफलक लावणे, सर्व निविष्ठाचे प्रिंसिपल प्रमाणपत्र परवान्यास जोडून सुधारणा करणे,स्टॉक बुक, विक्री रजिस्टर व लेझर बुक प्रामाणित करून नियमित लिहिणे, विहित प्रपत्रात पक्के बिलबुक ठेऊन सर्व निविष्ठाचे सर्व तपशीलासह व वाजवी दरासह स्वाताची व शेतकऱ्याची वस्वाक्षरी घेऊन मूळ प्रत शेतकऱ्यास देणे,खातांची विक्री पॉस मशीन वरून करूनच बिल लिहिणे व पॉस स्लिप बिलाचे स्थळ प्रतिस जोडून ठेवणे, खतांचा भौतिक साठा व पॉस मशीन ववरील साठा सारखा ठेवणे, बियाण्याचे गार्ड शॅम्पल ठेवणे, बियाण्याचे माहीती पत्रक शेतकऱ्यांना देणे, लिंकिंग न करणे व नों लिंकिंग फलक लावणे, बॅन असलेले व कालबाह्य झालेले कीटकनाशके व निविष्ठाची विक्री न करणे,खते व बियाणे यांचे सुरळीत व गरजू शेतकऱ्यांनाच वितरण करणे इत्यादी विषयी सूचना व मार्गदर्शन केले.

या प्रसंगी तालुका कृषि अधिकारी ललित राऊत यांनी अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करतांना धरती माता बचाव अभियान व राऊंडअप (चोरबीटी ) कपास बियाणे बाबत इत्यभूत माहीती दिली व कृषि केंद्र संचालकांच्या संपचे शेतकऱ्यांचे उत्पादनावर व येत्या खरीप हंगामावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करून रास्त मार्गे व नियमांचे पालन करून वेवस्याय करणाऱ्या केंद्र संचालकांना कृषि विभागाचे पुरेपूर साहाय्य मिळेल असे आश्वासन दिले.

तसेच कृषि निविष्ठा विक्रेते संघांचे अध्यक्ष अजय पोटवार यांनी विनयशिलतेने वेवस्य करून शेतकरी बांधवांची सेवा करण्याचे व नियंत्रण यंत्रनेस पुरेपूर सहकार्य करण्याचे आवाहन सर्व केंद्र संचालकांना केले.
सदर प्रशिक्षणास सचिन सांगिडवार, मोहन जोशी, राकेश काचिनवार, राहुल कोंडबत्तूलवार, प्रशांत वाढई यांच्या सह तालुक्यातील बहुसंख्य कृषि केंद्र संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रवीण वाघमारे यांनी केले.