महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायदा बदल उच्चस्तरीय समितीची पहिली महत्वपूर्ण बैठक पुणे येथे संपन्न

130

महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायदा बदल उच्चस्तरीय समितीची पहिली महत्वपूर्ण बैठक पुणे येथे सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक मा श्री दीपकजी तावरे उपस्थित होते.

 

सोबतच महाराष्ट्र राज्य सहकार कायदा बदल उच्चस्तरीय समितीचे सदस्य मा.श्री. विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई, मा.श्री. विवेक जुगादे, महामंत्री, सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेश, मा.श्री. संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई, मा. श्री. सुहास पटवर्धन, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हौसिंग सोसायटीज फेडरेशन लि. पुणे, मा.श्री. सिताराम राणे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन लि. ठाणे, मा. आयुक्त, साखर, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा.आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. आयुक्त, दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा.श्री. मधुकर चौधरी, सेवानिवृत्त सहकार आयुक्त, मा. श्री. दिनेश ओऊळकर, सेवानिवृत्त अपर आयुक्त, मा.श्री.एस.बी.पाटील, सेवानिवृत्त अपर आयुक्त, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, श्री. मिलींद भालेराव, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई, मा श्री राजेश सुरवसे, अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, समिती सचिव बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये राज्याच्या कायदा बदल संदर्भात विस्तृत चर्चा झाली. सोबतच राज्याचे सहकार धोरण ठरल्यानंतर या संपूर्ण कायद्यामध्ये कालानुरूप परिवर्तन करण्याचा ठराव याप्रसंगी घेण्यात आला. सर्व समिती सदस्यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण करत आपले अनुभव सांगितले. राज्याच्या सहकार कायदा बदल समितीच्या माध्यमातून राज्याचा सहकार कायदा अधिक सक्षम करण्याचा निर्धार याप्रसंगी घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष सहकार आयुक्त मा श्री दीपकजी तावरे यांनी उपस्थित सदस्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन सुद्धा केले.