नवरात्र निमित्ताने युवा स्वराज व्याहाड खुर्द तर्फे बालकांना साहित्य वाटप

647

युवा स्वराज बहुउद्देशीय संस्था व्याहाड खुर्द यांच्या सौजन्याने नवरात्र महोत्सव निमित्त अंगणवाडी मधील बालकांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रत्येक बालकाला एक बास्केट, टिफीन बॉक्स,पाणी बॉटल असलेल्या संचाचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आशिष पुण्यापवार, सचिव राहुल भंडारे, संस्थेचे सदस्य दिपक जवादे, संजय मजोके, श्रीकांत यंपलवार, राजू बांबोले, राजू मडावी, प्रवीण रामटेके, तेज कुमार पूनवटकर,अनिकेत शेडमाके,भूषण टोंगे,महेश गेडाम, सिध्दार्थ साखरे व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचे सहकार्य लाभले, त्याबद्दल संस्थेकडून भेटवस्तू देण्यात आले.

या प्रसंगी गावातील जनता सुध्दा उपस्थित होती, त्याबद्दल संपूर्ण ग्रामावसिय जनतेचे संस्थेकडून आभार मानण्यात आले.