चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक २६१ तर शिपाई ९७ पदांची भरती ला सुरुवात

2071

ऑनलाइन अर्ज ला सुरुवात १९ ऑक्टोबर शेवट ची तारीख

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपुर या बँकेत २६१ लिपीक व ९७ शिपाई या पदांची ऑनलाईन परिक्षा प्रक्रियेव्दारे सरळसेवा भरती करणेची आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सदर Online फॉर्मस् (अर्ज) WWW.cdccbank.co.in या संकेत स्थळावर दि. ०८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० ते दि. १९ ऑक्टोबर २०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. सदर फॉर्मस (अर्ज) व परिक्षा शुल्क ऑनलाईन भरुन त्याच संकेतस्थळावर (Submit) करावेत. सदर रिक्त पदे भरतीचे अनुषंगाने अधिक माहिती/निकष/पात्रता/अटी शर्ती व इतर तपशिल WWW.cdccbank.co.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.


अर्ज स्विकारणेची अंतिम तारीख दिनांक १९/१०/२०२४ अखेर रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील. बँकेकडे थेट तथा पोस्ट/कुरिअर व्दारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.असे चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर भि. कल्याणकर यांनी म्हटले आहे.