मेंढपाळावर वाघाने केला हल्ला; मेंढपाळ गंभीर जखमी

2365

 

सावली वनपरिक्षेत्रातील घटना

सावली वनपरीक्षेत्रातील टेकाडी बिट अंतर्गत येत असलेल्या आकापूर च्या midc या परिसरात मेंढ्या चारत असतांना वाघू नागाजी कंकलवार (५० )या मेंढपाळावर वाघाने हल्ला केल्याने मेंढपाळ गंभीर जखमी झाला असून गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

तालुक्यात वाघांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसत असून आज दुपारच्या सुमारास चांदली बुज. येथील मेंढपाळ वाघू कंकलवार हे नेहमी प्रमाणे मुल तालुक्यातील आकापूर एमआयडीसी परिसरात मेंढ्या चारत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला असता. त्यावेळी कंकळवार यांच्या सोबत्याने आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला. या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाल्याने सावली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारा करिता भरती करण्यात आले मात्र जखमीची प्रकृती बघता पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनाधिकारी धुर्वे,कोडापे, आखाडे यांनी सावली रुग्णालयात जाऊन जखमीची विचारणा करून घटनेचा पंचनामा करीत आहे.

या वेळी विजय कोरेवार,सतीश बोम्मावार, विठ्ठल येगावार,जोनमवार यांनी जखमीची भेट घेऊन प्रकृतीची व घटनेची विचारणा केली.