बलात्कारी अमोल लोडे च्या निषेधार्थ गोंडपीपरी येथे भाजपा चा आक्रोश मोर्चा

1067

कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शिक्षक अमोल लोडे या नराधमाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी तालुक्याच्या वतीने शहरातील मुख्य मार्गाने आक्रोश मोर्चा काढून नराधम अमोल लोडे व त्याला पाठीशी घालणाऱ्या विकृत कॉंग्रेसी मानसिकतेचा नोंदविण्यात आला.

 

मोर्चात तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जाहीर निषेध नोंदवला. त्याचवेळी बलात्कारी अमोल लोडेला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी ही भाजपतर्फे करण्यात आली.आंदोलनाच्या शेवटी विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांचेसह गोंडपिपरी तालुका महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन बलात्कारी अमोल लोडे व त्याला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे दिलेल्या निवेदनात म्हटले.

या आंदोलनात जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुका प्रभारी नामदेव डाहुले, तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे, शहराध्यक्ष चेतन गौर, सुहास माडुरवार, दिपक बोनगीरवार, महामंत्री गणपती चौधरी, महामंत्री निलेश पुलगमकर, महामंत्री सतीश वासमवार, उल्हास करपे, रितेश वेगीनवार, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पुन, उपसभापती स्वप्नील अनमुलवार, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा स्वाती वडपल्लीवर, सुरेखा श्रीकोंडावार, सपना तामगाडगे, मायाताई वाघाडे, वैष्णवी बोडलावार, भानेश येग्गेवार, अण्णा उलेंदला, संदीप पौरकर, मनोज वनकर, अरुण कोटघरे, पंढरी चिंचोळकर, संजय येलमुले, स्वप्नील बोनगिरवार, वैभव बोनगिरवार, रणजीत लांबाडे, संजय कोमावार, रमेश दिनगलवार, शितील लोणारे, गणेश मेरुगवार, पंकज चीलनकर, नितीन तुमडे, प्रकाश राफलवार, शहराध्यक्षा ॲड. अरुणा जांभुळकर, नगरसेविका शारदा गरपल्लीवार, मनीषा दुर्योधन, लक्ष्मी बिस्वास, अस्मिता राफलवार, योगिता वडस्कर, सुशीला पुलगमकर, कोमल मुगलवार, परशुराम कुबडे, राजेंद्र गोहणे, सुरेंद्र घाबर्डे, संतोष मुगलवार, लक्ष्मण येलमुले यांचेसह तालुक्यातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.