उपसरपंच परशुरामजी भोयर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने….

359

सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील एकविरा देवीच्या पायथ्याशी असलेल्या मनोहरजी भोयर यांच्या कुटुंबातील मोठे चिरंजीव परशुराम मनोहर भोयर हे व्याहड बुज सारख्या मोठ्या गावचे उपसरपंच आहेत.दिनांक 10 ऑक्टोंबर ला त्यांच्या वाढदिवस त्यांच्या विषयी लिहतांना अतिशय आनंद होत आहे.

आपल्या गरीब कुटुंबात जन्म झालेल्या परशुराम यांच्या विषयी त्यांचे शिक्षण फक्त 10 वी पर्यंत.
झाले आहे.मात्र शिकण्याची जिद्द मनात होतीच पण आपल्याही पाठीमागे लहान भाऊ व बहीण आहे ते शिकले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या पुढील शिक्षणाकडे दुर्लक्ष केले.घरात वडील मोल मजुरी करायचे मात्र पुढील संकटे लक्षात घेता परशुराम यांनी घराजवळ छोटे सायकल पंचर दुरुस्ती चे दुकान टाकले.त्याच दुकानाचा भरवशावर त्यांनी आपले संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करायला सुरुवात केली.

 

ढिवर समाजात जन्म झालेल्या परशुराम ची आर्थिक स्तिथी ही आधीपासूनच बिकट होती वडिलांच्या मजुरीवर भागत नाही म्हणून कामाला सुरुवात केली मात्र पुढे काही तरी करण्याची जिद्द मात्र त्याच्या मनात होतीच म्हणून ते यशस्वी झाले.अतिशय शांत,स्वभाव म्हणून त्यांच्या परिचय होता. लहान भाऊ नामदेव हा शिकणानंतर तोही हार्डवेअर च्या दुकान सुरू केला त्यातच परशुराम ची मदत होतीच. मात्र त्यांनी आपला सायकल चा व्यवसाय बंद केला नाही.

परशुराम च्या या स्वभावामुळे त्याच्या वार्डातील अनेकजण काही वर्षापासून त्याला ग्रामपंचायत च्या निवडणूक यामध्ये सहभागी हो असे म्हणायचे मात्र तो नकार द्यायचा मात्र अनेक वर्ष अनेक सामजिक कामे केल्यानंतर जनतेचा आग्रहाखातर सन 2021 ला स्थानिक ग्रामपंचायत मध्ये निवडणूक लढवली आणि त्यात मोठा विजयी झाले. आणि त्यानंतर उपसरपंच चा पदभार घेत काम केले काही काळ प्र. सरपंच चे काम केले.जनतेची सेवा ही ईशवरीय सेवा मानून काम सुरू आहे. राजकीय वारसा नसतांना ही जनतेचे काम केल्याने या पदापर्यंत पोहचल्याचे समाधान ही परशुरामजी नेहमी बाळगतात.आणि माझ्या या कार्याला माझा लहान भाऊ नामदेव ची खूप साथ मिळते हेही तो तेवढंच आवर्जून बोलतो.
या प्रेमळ व शांत स्वभावाचा धनी असलेल्या.. राजकीय उगवत्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा💐💐