सावलीचा राजा गणेश मंडळ तर्फे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

991

 

*शेकडो रुग्णांनी घेतला लाभ*

 

सावलीचा राजा युवा गणेश मंडळ सावली च्या वतीने व सेवा क्लिनिक चंद्रपूर यांच्या सौजन्याने आज़ 15 सप्टेंबर ला विनामूल्य आरोग्य शिबिर सावलीचा राजा मंडप परिसरात आयोजित करण्यात आला आणी तज्ञ डॉक्टर यांच्या सल्याने व उतम मार्गदर्शनाने रुग्णाची तपासणी करण्यात आली .

या आरोग्य शिबिरात डेंगू ,मलेरिया ,सतत सर्दी चा त्रास टायफाईड गुडके दुखी ,कबर दुखी या सर्व प्रकारच्या आरोग्यावर तपासणी करण्यात आली तज्ञ डॉक्टर वैभव आगलावे ,डॉ .प्रथमेश कोटकर जनरल फिजिशियन यांच्या उत्तम मार्गदर्शनातून सावली राजाच्या शिबिरात जे शेकडो रुग्णांनी नोंदणी करून तपासणी केली व मोफत औषध वितरण केले तसेच बाधित रुग्णाना आज पासून ते 3 महिन्यापर्यंत अगदी मोफ़त उपचार मार्गदर्शनांतून सर्व गरजू रुग्णांची आरोग्य सेवाचा लाभ दिला जाणार आहॆ .

सावलीचा राजा युवा गणेश मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाले आहॆ.हा 26 वा वर्ष असून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहॆ या ही वर्षी सुधा मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजत गणेशजी च्या आशीर्वादाने कार्यक्रम नियोजित मोफत आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक उपक्रम जोपासला आहॆ यात सावलीच्या राजा युवक गणेश मंडळ चे अध्यक्ष,सचिव पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करिता अथक परिश्रम घेतले.