चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील वाघोली बुटी जवळ ट्रक- पिकअप चा भीषण अपघात

3743

 

पिकअप चा झाला चेंदामेंदा

सावली(सूरज बोम्मावार)
सावली तालुक्यातील चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली बुटी जवळ आज सकाळी सातच्या दरम्यान ट्रक व पिकअप या दोघात भीषण अपघात झाला.

अपघात एवढा मोठा झाला की त्यात पिकअप यांचा संपूर्ण चेंदामेंदा झाला तर ट्रकने सुद्धा पलटी मारत ट्रकचे सुद्धा टायर फुटल्याचे निदेशात येत आहे.

सदर अपघाता नंतर घटनास्थळी अनेकांनी बघण्यासाठी धाव घेतली. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक सुद्धा ठप्प झालेली होती. या अपघातात दोन जण जखमी असल्याचे कळते आहे मात्र अपघात नेमका कसा घडला? आणि कोणते वाहन कुणाकडून येत होते याची माहिती अद्यापही प्राप्त झाली नसून या प्रकरणाचा तपास सावली पोलीस करीत आहे.