
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री,शब्दात जागणारा व विकास पुरुष नेते ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावली येथे आर्य वैश्य महासभा च्या पदाधिकारी यांनी युवा नेते राकेश विरमलवार यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले.
सुधीर भाऊ म्हणजे जनसामान्यांचे नेते असून विकासाची कास धरणारे आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो व उत्तम आरोग्य लाभो अश्या शुभेच्छा यावेळी युवा नेते राकेश विरमलवार यांनी दिल्या.

सुधीर भाऊ यांनी वृक्ष लाडवडी चा विक्रम केला आहे.वृक्षा वर प्रेम करणारा,जनतेवर ,समाजावर प्रेम करणारा नेता म्हणून सुधीरभाऊ ची ख्याती आहे.जनसामान्यांचे लोकनेते म्हणून सुधीरभाऊ कडे पाहिले जात असून म्हणून आम्ही वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करीत असल्याची प्रतिक्रिया समाजातील युवा व्यापारी रवींद्र ताटकोंडावार यांनी दिली.
वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंग युवा नेते राकेश विरमलवार,रवींद्र ताटकोंडावार, राकेश दंडमवार, निखिल यासलवार,बालाजी कन्नावार आदी पदाधिकारी उपस्थित होते.








