सतत पडणाऱ्या पाऊसामुळे करगाव-पाथरी रस्त्यावर पडले भगदाड

451

 

पाथरी (नितीन अढिया )
मागील काही दिवसापासून येणाऱ्या सतत च्या पावसामुळे करगाव जवळ असलेलं नाल्याजवळील रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत यंदाच्या सतत पडणार पाऊस त्यामुळे त्या नाल्यावर पाणी असतो त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे रस्ता खराब झालं आहे.

करगाव येथील विद्यार्थी पाथरीला शिक्षनासाठी व तेथील जनता बँकेच्या तसेच इतर कामासाठी त्यांना पाथरी यावे लागते त्यामुळे तो खड्डा धोकादायक बनला असून अपघाताला आमंत्रण देणारा आहे.तरी या खड्ड्याची लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी करगाव येथील जनतेनी केली आहे.