सततच्या पावसाने मेहा बुज. येथे 6 घरे पडली

448

 

तातडीने पंचनामे करुन मदत देण्यात यावी गावकऱ्यांची मागणी

आठवड्यापासून सतत पाऊस पडत आहे. पावसाने साऱ्यांची दैना झाली आहे. या अतिवृष्टीचे सावली तालुक्यातील मेहा बुज येथील पाच ते सहा जनांची घरे पडली. परिणामी त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. शासनाने घरे पडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली आहे.

या आठवड्यात सांसतधार पाऊस होत आहे. यामुळे वीटा मातीचे घरे कोसळून नुकसान होत आहे. मेहा बुज येथील सविता विनायक पेंदाम,महादेव राघो ठाकरे,चिमनदास गिरीधर निकुरे,ताराचंद कोंडुजी निकुरे,मुकुंदा पांडुरंग निकुरे, चुडीराम दादाजी भोयरयांचे पावसामुळे घर पडले त्या मुळे त्यांचा संसार उघड्यावर आला.
मेहा बुज येथे अतिवृष्टीने झड़पड़ झालेल्या घरांची तातडीने पंचनामे करुन शासनाने तातडीने मदत देण्यात व अश्यातच शासनाने घरकुल योजनेमार्फत लाभ मिळवून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांतर्फे होत आहे.