उद्या कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा नागरी सत्कार

995

 

*समाजबांधवाने बहु संख्येने उपस्थीत राहण्याचे आव्हाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.*

सावली तालुका कुणबी समाज
बहुउद्देशीय संस्था व्याहाड खुर्द तथा सावली तालुका कुणबी समाज बांधवाच्या वतीने कुणबी समाजातील वर्ग 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांचा नागरी सत्कार दिनांक 29 जुन 2024 रोज शनिवारला दुपारी 12:00 वाजता देवराव मंगल कार्यालय व्याहाड खुर्द येथे आयोजित केलेला आहे.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे , गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे एडवोकेट .संजय ठाकरे,प्रमोद चिमूरकर, एडवोकेट. गोविंदराव भेंडारकर,रत्नमाला भोयर,विनोद नवघडे,कृष्णा सहारे,अविनाश पाल,ऋषी राउत,मारोती शेरकी,प्रफुल महाजन तथा जेष्ठ समाज कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. तरी सर्व कुणबी समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हाहन अध्यक्ष अर्जुन भोयर व पदाधिकाऱ्यातर्फे व संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.