ब्रेकिंग न्यूज…रेल्वेच्या धडकेत बिबट ठार

796

मध्य चांदा वन विभागाचे राजुरा वनपरिक्षेत्राचे चनाखा नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक 160 मधून जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वे लाईनवर रेल्वेच्या धडकेत अंदाजे 3 वर्षीय बिबट ठार झाल्याची घटना आज दिनांक 27 रोजी दुपारच्या वेळेत घडली.

राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहिरगाव उपक्षेत्राचे कक्ष क्रमांक 160 मधून मध्य व दक्षिण रेल्वेच्या ट्रक जाते आज दुपारच्या सुमारास याच ट्रेकवरून रस्ता ओलांडत असताना रेल्वेची धडक बसल्याने बिबट चा मृत्यू झाला
याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी वरिष्ठ अधिकाऱयांना याची माहिती देऊन तात्काळ घटनास्थळी अधिनस्त वनकर्मचार्यांना घेऊन पोहचले मोका पंचनामाँ करून पशुवैद्यकीय अधिकार्याचे सुचनेसार उत्तरीय कारवाई सुरू आहे.

पुढील कार्यवाई उपवनसरक्षक श्वेता बोड्डू यांचे ,उपविभागीय वन अधिकारी पवन कुमार जोग यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड आणी वनकर्मचारी करीत आहेत