घोरपडी सह एक आरोपी अटकेत:धाबा वन विभागाची कारवाई

890

 

गोंडपीपरी(प्रतिनिधी)-
शेत शिवारात असलेल्या घोरपडीला पकडून कापण्याचे उद्देशाने आणीत असताना वनकर्मचार्यानी एका आरोपीस अटक केली आहे.

 

मध्य चांदा वन विभागाचे धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गोंडपीपरी उपक्षेत्राचे नियतवनक्षेत्र सुकवासी येथील शेतशिवारात घोरपड हे वन्यजीव पाऊस पडल्यानंतर उन्हात बाहेर पडली यावेळी शेतात असणारे रमेश रामटेके राहणार धामणगाव यांच्या नजरेत ती घोरपड दिसली, ती घोरपड कापून खाण्याचे उद्देशाने पकडली आणि घरी आणले परंतु याची गुप्त माहिती वनविभागास मिळाली त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले वरिष्ठ वन अधिकाऱ्याचे मार्गदर्शनात आरोपीचे घरी धाड टाकली असता त्याचे घरी जिवंत घोरपड आढळून आली मोका पंचनामा करून मुख्य आरोपी असलेले रमेश रामटेके यांस घोरपडी सह ताब्यात घेऊन पुढील तपास केला त्यांना उपक्षेत्र कार्यालय गोंडपीपरी येथे आणून वरिष्ठ अधिकाऱ्याचे सूचनेनुसार अटक करण्यात आली आणि पुढील कारवाई सुरू आहे

ही कारवाई उपवनसरक्षक श्वेता बोड्डू ,सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेडगे याचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे यांचे नेतृत्वात क्षेत्र सहायक राजेंद्र लडके,वनरक्षक जयदेव दत्ता,अनिल चुदरी, वनमजुर नाजूक निकोडे,दिलीप देव्हाडे,नामदेव घुबडे यांनी केली पुढील तपास सुरू आहे

#जिवंत घोरपड पकडण्याची आमच्या वनकर्मचार्यानी कारवाई केली आहे हे प्रशंसनीय आणि वेळेत कारवाई केली आणि जिवंत घोरपडीला जीवदान देता आले, पशुवैद्यकीय अधिकार्याचे तपासणी नंतर त्याला नैसर्गिक वातावरणात सोडण्याची कारवाई सुरू आहे, कुणीही जगलात अपप्रवेश करू नये,वने वन्यजीव संरक्षण बाबत जनजागृती सुरू आहे तरीपण असे काही लोकांकडून गैरकृत्य होणे दुर्दैवी आहे,असे असतानाही पोलीस पाटील,सरपंच,सामाजिक संस्थेने सुद्धा या जनजागृती साठी सहकार्य करण्याची गरज आहे”
शेषराव बोबडे,वनपरिक्षेत्र अधिकारी,धाबा