(सूरज बोम्मावार -संपादक) पुढील सहा महिन्यावर विधानसभा क्षेत्राच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे.त्यामुळे बल्लारपूर, मूल,पोभूर्णा या विधानसभा क्षेत्रात सध्या काँग्रेसकडून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तरी असले तरी मात्र पुढील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सदर जागा ही महाविकास आघाडी च्या माध्यमातून शिवसेना (उबाठा) गटालाच मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या 30 वर्षापासून या क्षेत्रात काँग्रेस अद्यापही आपली विजय पताका फडकवू शकली नाही.अनेकदा उमेदवार उभे राहून त्यांचा दारुण पराभवच झालेला आहे. हाच विषय घेऊन शिवसेना (उबाठा) गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातून बल्लारपूर व चिमूर तसेच वरोरा या विधानसभा क्षेत्राची निवड केलेली आहे तसेच गडचिरोली जिल्ह्यातून आरमोरी या क्षेत्रावर सुद्धा आपला दावा केलेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हा विधानसभा क्षेत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ला आहे मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 40 हजाराहून अधिकची लीड ही काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रतिभा धानोकर यांना मिळाल्याने आता या क्षेत्रातून अनेक जण कांग्रेस कडून निवडणूक लढण्यास सज्ज झालेले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा,वरोरा, ब्रह्मपुरी हे क्षेत्र काँग्रेसच्या आमदार आहे तर बल्लारपूर चिमूर हे भाजपाकडे तर चंद्रपूर येथे अपक्ष उमेदवार हे विजय झालेले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजय झालेले आहे त्या जागा या काँग्रेसलाच मिळणार आहे त्यामुळे समोर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये शिवसेनेने बल्लारपूर व चिमूर हे दोन क्षेत्र व जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या साठी वरोरा-भद्रावती शिवसेनेला मिळावे याकरिता त्यांनी आपली तयारी सुरू केलेली आहे तसेच या क्षेत्रातून शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांना आपले कार्य सुरू करा असे निर्देशही दिले आहे.
मागील निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेला दोन विधानसभा क्षेत्र हे दिल्या गेले होते त्यात वरोरा व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र होते मात्र शिवसेना आता महायुती सोडून महाविकास गटात सामील झाल्याने आपले दावा हा कायम ठेवलेला आहे तशी तयारीही त्यांनी सुरू केलेली आहे. शिवसेनेच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना हे महाराष्ट्रात 100 हुन अधिक जागा लढणार आहे त्यातच बल्लारपूर विधानसभा क्षेत्र चे नाव हे 50 चा आतच्या यादी मध्येच असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे लागले कामाला
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे हे ओबीसी प्रवर्गातील असून ते मागील बल्लारपूर-पोंभुरणा-मूल या क्षेत्रात गेल्या 8 वर्षापासून काम सुरू केले आहे.या क्षेत्रातील प्रत्येक गावात शाखा विस्तार तसेच संघटन मजबूत केले आहे.त्यामुळे अनेक गावात सरपंच, पोंभुरणा, बल्लारपूर मध्ये नगरसेवक सुद्धा आहे.त्यांचे काम सध्या जोरात सुरू असून पक्षाने जोमात कामाला लागा असे आदेश दिले आहे.लोकसभा निवडणुकीत कांग्रेस च्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विजयासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणूकित कदाचित शिवसेने ला क्षेत्र सोडण्यासाठी धानोरकर ही विरोध करणार नाही असेही बोलले जात आहे.








