रानटी डुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

882

 

*जखमी महिलेला तत्काळ मदत द्या – नगरसेवक सतीश बोम्मावार यांची मागणी*

सावली पासून ४ कि.मी. अंतरावर सावली तुकूम (तीन कवाळी) येथील महिला भारती मनोज चौधरी (४३) हि शेतामध्ये काम करत असतांना दुपारी 12.30 च्या सुमारास रानटी डुकराने हल्ला केल्याने सदर महिला हि गंभीर जखमी झाली असता ग्रामीण रुग्णालय सावली येथे भर्ती करण्यात आले परंतु सदर महिलेची गंभीरता बघता तिला तत्काळ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.

या घटनेची माहिती नगरसेवक सतीश बोम्मावार यांना मिळताच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्वे यांना देण्यात आली असता धुर्वे यांनी ग्रामीण रुग्णालयात धावघेत जखमी ची पाहणी करून सदर घटना स्थळी जाऊन पंचनामा करण्यात आले. या वेळी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी वनपरिक्षेत्र यांना जखमी महिलेला तत्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.