सावलीत डम्पिंग यार्ड ला आग

1253

 

*अग्निशमन दल वाहनाचा चालक बनला नगराध्यक्षांचा मुलगा*

 

आज सावली येथील डम्पिंग यार्डला 11 वाजताच्या सुमारास लागलेला अचानक आगीने एकच खळबळ उडाली. मात्र सदर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचा चालक वेळेवर नसल्याने खुद्द नगराध्यक्ष लताताई लाकडे यांचा मुलगा ऐश्वर्य हा चालक म्हणून बसला आणि गाडी चालवत आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आज केला आहे.

प्रभाग क्रमांक 16 या प्रभागात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष लताताई लाकडे हे प्रभागात गेले असता त्यांना त्यांच्याच प्रभागातील तलावाचा बाजूने असलेल्या डंपिंग ऍड मधून मोठ्या प्रमाणामध्ये धूर निघत असल्याचे दिसून आले त्यामुळे सदर निघत असेलेला धूर कशाचा आहे म्हणून बघितला असता त्या ठिकाणी आगीच्या भडका असल्याचे दिसून येत होते त्यामुळे यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली मात्र अग्निशामक दलाचा गाडी आना असे सांगितले मात्र अग्निशमन दलाच्या गाडी चा चालक हा त्यावेळी उपस्थित नसल्याने गाडी कोण आणेल असा प्रश्न निर्माण झाला त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष लताताई लाकडे यांचा मुलगा ऐश्वर्य हा चांगला वाहन चालक आहे त्यामुळे परिस्थिती लक्षात घेत स्वतः स्टेरींग वर बसून त्या घटनास्थळी गाडी आणली. आणि आग आटोक्यात आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि तब्बल दोन तासानंतर ती आग आटोक्यात आणली . नगराध्यक्ष लाकडे यांचा मुलगा ऐश्वर्य यांनी केलेल्या या धाडसी कार्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

नगराध्यक्ष लता ताई लाकडे, त्याचप्रमाणे नगरसेवक विजय मुत्यालवार, नगरसेवक प्रफुल वाळके, अभियंता दुधबळे ,अभियंता रोहित शुक्ला,कर्मचारी आशिष खोब्रागडे व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.