कोठारीत 20 हजाराची चोरबिटी जप्त ; पोलिस व कृषि विभागाची कार्यवाही

579

 

एस न्यूज नेटवर्क / बाळू निमगडे/आक्सापूर-

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाच्या माध्यमातून विकास खाडे यांचे गाडीमध्ये संशयास्पद अनधिकृत कापूस बियाणे आढळून आले.20 पॉकेट एकूण वजन 9 किलोग्राम,ज्याचे मूल्य रुपये 18600/- (अक्षरी अठरा हजार सहाशे रुपये ) मूल्याचे बियाणे काल (दि.1) पकडण्यात आले.सदर कारवाई माननीय विनय गौडा जी सी.,जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुमक्का सुदर्शन,जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर,शंकरराव तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर तथा विभागीय कृषी सहसंचालक,नागपूर विभाग, नागपूर,वीरेंद्र रजपूत,कृषी विकास अधिकारी,लकेश कटरे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली कोठरीचे ठाणेदार आशिष बोरकर,श्रीधर चव्हाण तालुका कृषी अधिकारी,विवेक एस.उमरे,कृषी अधिकारी,पंचायत समिती बल्लारपूर, व कृषी विभागाची सपूर्ण टीम यांनी ही कारवाही केली.सदर प्रकरणी विकास खाडे रा.पळसगाव यांचेवर अनाधिकृत बियाणे बाळगणे,विक्री करणेबाबत पोलीस स्टेशन कोठारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.