सुरजागडच्या अवजड वाहतुकीवर आळा घाला

284

 

* ‘भीम आर्मी’च्या प्रमोद कातकर यांची मागणी

एस न्यूज नेटवर्क /बाळू निमगडे/आक्सापूर-

सुरजागडच्या अवजड वाहना‌द्वारे बामणी-कोठारी-गोंडपिपरी-आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातावर आळा घालण्याची मागणी भीम आर्मी संघटनेनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

बामणी-कोठारी-गोंडपिपरी ते आष्टी राष्ट्रीय महामार्गावर सुरजागड लोहखनीज वाहतूक करणारे अवजड वाहने दिवस-रात्रो सुसाट धावत असतात.या वाहनामुळे छोटे-मोठे रस्त्यावरील वाहनासह इतर लोकांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.दरम्यान महामार्गावर अनेक वाहनचालकांचा जीव गेला.

 

या मार्गावरिल वाहतूकीवर आरटीओचे नियत्रंण नसल्यामुळे अपघाताची मालीका रोजच सुरू आहे.सदर वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी सुरजागड प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.त्याचवेळी ही जिवघेनी वाहतूक कधी थांबणार,हा प्रश्न भीम आर्मी संघटनेनी केला आहे.लोहखनीज घेवून जाणाऱ्या वाहनामुळे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत असल्यामुळे या महामार्गावरीत छोट्या-मोठ्या वाहनचालकात संताप व्यक्त केल्या जात असताना बामणी-कोठारी-गोंडपिपरी-आष्टी महामार्गाच्या वेगावर नियत्रंण करावे.सुरजागड प्रशासनाकडून वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिसरातील बेरोजगार असलेल्या तरुणांना प्रशिक्षण देवून सुरक्षरक्षक म्हणून त्यांची नेमणूक करावी,असे निवेदनात नमूद केले आहे.

 

स्थानिकांना रोजगार मिळेल आणि सुरजागडच्या गाड्यावर नियंत्रण राहील या हेतूने मागणी रेटली असता भिमआर्मी संघटनेच्या निवेदनात सांगितल्यानुसार कारवाही व्हावी,असे कंपनी प्रशासनाला सुचविण्यात आले.वरील बाबींचा विचार करून गंभीर परिस्थितीतून मार्ग काढता येईल.दरम्यान याकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा या महामार्गावर अपघात होत राहतील.अशावेळी भिमआर्मी संघटनेनी कोठारी पोलिसांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या.त्याची अंमलबजावणी न झाल्यास चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कातकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.