एस न्यूज नेटवर्क / सावली / सौरव गोहने
सावली येथे खेळण्याचे मैदान नसल्याने अनेक युवकांना याचा त्रास सहन करावा लागत होता मात्र येथील काही युवक एकत्र येत सावली येथील संत योगी नारायण बाबा मठाचा मागील जागेवर संपूर्ण नगरपंचायत सावलीच्या सहकार्याने झाडे झुडपे तोडून एक क्रीडा संकुल तयार करण्यात आले त्या क्रीडा संकुलात अनेक कार्यक्रम सुद्धा पार पडले मात्र या ठिकाणी रोज व्यायाम चा सराव करण्याकरिता शेकडो मुलं-मुली या ठिकाणी येत असतात मात्र या ठिकाणी व्यायाम करण्याच्या दृष्टिकोनातून कसलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने अनेक सराव करणाऱ्या युवकांचा हिरमोड होता त्यांना दिसत आहे.
सावली येथील नगरसेवक सतीश बोम्मावार हे त्याच क्रीडा संकुलावर गेले असता सराव करणारया अनेक युवकांनी आपली व्यथा मांडून त्या ठिकाणी ओपन जिम देण्याची मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने नगरसेवक तथा गटनेता सतीश बोम्मावार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे पत्राद्वारे याच क्रीडा संकुलावर व्यायाम करण्याचे साहित्य लावावे व खुली जिम देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.








