जिबगाव येथे खरीप हंगाम पूर्व सभेचे आयोजन

516

 

 

अक्षय तृतीये पासून खरीप हंगामाचे कामांना सुरुवात होते. त्याच अनुषंगाने आता सावली तालुक्यात सुद्धा शेत शिवार स्वछता, धस्कटे काढणी, जाळपोळ, उन्हाळी नगरटी, बांध बंधिस्ती, बियाणे व खते नियोजन इत्यादी खरीपाचे कामाची लगबग सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

 

तालुक्यात खरीपातील मुख्य पिक भाताचे आहे. परिसरात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात पारंपरिक व तांत्रिक पद्धतीने केल्या जात असल्यामुळे हेक्टरी उत्पादनातील वाढ कमी असल्यामुळे तालुका कृषि विभाग दर वर्षी परिसरात खरीप हंगाम पूर्व सभा, मेळावे, भिंती पत्रके,समाज माध्यमे, वयक्तिक संपर्क, प्रत्यक्षिके या व उपक्रमांद्वारे उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपरेंत पोहचवीन्याचे कार्य करीत असल्याचे दिसते.
याच अनुषंगाने तालुक्यातील जिबगाव येथे नुकतेच शेतकरी महिलांची सभा आयोजित करण्यात आली.

 

सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषि अधिकार दिनेश पानसे यांनी उपस्थितांना खरीप हंगामा नियोजन माहीती देतांना हंगाम पूर्व कामे, माती परीक्षण व त्यानुसार खातांचा एकात्मिक वापर, नॅनो यूरिया, नॅनो डी.ए.पि. व विविध रासायनिक तथा शेंद्रीय, जैविक – जिवाणू व हिरवाळीची खते-बोरु, ढेंचा, गिरीपुष्प, ऍझोला, बियाणे वान निवड,बियाणे खरेदी काळजी, बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासणी, रोपवाटिका वेवस्थापन,सामूहिक रोपवाटिका, भात लागवडीच्या- “श्री पद्धत, पट्टा पद्धत, चार सूत्री पद्धत, ओळीतील लागवड पद्धत व यांत्रिक आणि टोकन पद्धत, एकात्मिक कीड वेवस्थापन, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, मेटॅरायझियान द्रावण, फेरोमेन ट्रॅप, लाईट ट्रॅप, स्टटिकी ट्रॅप, ट्रायको कार्ड,सापळा पिके इत्यादी विषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.

 

प्रसंगी कृषि सहायक तृप्ती काटरपवार यांनी बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणी, मेटॅरायझियाम द्रावण तयार करणे इत्यादी प्रत्यक्षिके करून दाखले. तसेच पिक विमा, ई पिक पाहणी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, कृषिक अँप, फळाबाग लागवड व कृषि विभागाच्या योजनाची मागिती दिली.
प्रसंगी कृषि सखी श्रीमती संगीता ठाकूर, मोना उंदीरवाडे, ताईबाई देठे यांनी सहकार्य केले. ग्रामस्थ महिला शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गर्शनाचा लाभ घेतला.आभार प्रदर्शन कृषि सहाययिका तृप्ती कटरपवार यांनी केले.