बिबट्याच्या हल्यात मेंढपाळ जखमी,पोंभुरणा तालुक्यातील घनोटी येथील घटना

171

एस न्यूज नेटवर्क /राजुरा(प्रतिनिधी)-
पोभुर्णा तालुक्यातील घनोटी येथे मेंढपाळांचा कळप बसलेला असताना रात्री साडेबारा वाजता च्या दरम्यान झोपेत असलेल्या मेंढपाळावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला आणि जखमी केले, आरडाओरडा केल्यामुळे बाजूलाच असलेले सोबती धावून गेल्याने वाघाच्या हल्ल्यातून मेंढपाळ थोडक्यात बचावले,ही घटना पोंभुरणा तालुक्यातील घनोटी शेतशिवारात घडली आहे

  • प्राप्त माहितीनुसार काल दि 11 मे रोजी मारोती सोमेश्वर बालुगवार राहणार भंगाराम तळोधी ता. गोंडपिपरी येथील मेंढपाळ आपल्या मुलबाळासोबत मेंढ्या घेऊन घनोटी येथे शेतशिवारात होते, मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास गाढ़ झोपेत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला, मारोती ने हल्ला होताच आरडाओरडा केल्यामुळे त्याला सोडून वाघाने पळ काढला, मारोती बालूगवार यांच्या गळ्यावर, मानेवर गंभिर दुखापत झाली आहे. सदर घटनेची माहिती होताच वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहायक श्याम यादव ,वनरक्षक शीतल कुलमेथे यांनी मोका पंचनामा करून जखमीस विचारपूस केली तसेच पुढील कार्यवाही सुरू केली
    विशेष म्हणजे आदल्या दिवशी याच ठिकाणी बिबट्याने एका बकरीवर हल्ला करून ठार केले इतक्यात मेंढपाळ आरडाओरड करताच बिबट पळून गेला परंतु ही माहीती वन विभागास न देता त्या मेंढपाळ याने त्या बकर्याचे मांसाचे विल्हेवाट करून विक्री सुद्धा केली अखेर बिबट्याने दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी हल्ला चढवीत मेंढपाळालाच जखमी केले हा योगायोग किंवा बिबट्याने बदला घेतला असा विनोंदात्मक चर्चा रंगत आहे