“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमात कर्मवीर विद्यालय,लाठी शाळा गोंडपीपरी तालुक्यातून प्रथम. .

287

 

राजुरा (संतोष कुंदोजवार, )-
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमात गोंडपीपरी तालुक्यातून कर्मवीर विद्यालय लाठी या शाळेला पहिला क्रमांकाचा मान मिळाला.
तालुक्यातील अनेक शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका सुधाताई वासाडे यांचे मार्गदर्शनात सहायक शिक्षक देवानंद ढुमणे, चंद्रकांत आसुटकर,सतीश मेश्राम,लक्ष्मी कडते,संतोष कुंदोजवार ,प्राध्यापक अरुण नक्षीने,प्रा,वामन मोरे,प्रा, सुरेश ,पिंपळकर,शिक्षकेतर कर्मचारी लिपिक अंकुश वनमाळी,किशोर देवाडकर,सुरेश खेडेकर यांनी शालेय परिसरात विद्यार्थी-पालक यांच्या सहकार्याने परसबाग, माजी विद्यार्थी संघ, शाळा मंत्रिमंडळ, राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड युनिट, आरोग्य तपासणी, विविध क्रीडास्पर्धा, शैक्षणिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती, शोषखड्डा, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, बचत बँक, गांडूळखत निर्मिती, तसेच मासिकपाळी ,स्वयंरक्षण, योगा, कौशल्य विकास , हातधुण्याचे प्रात्यक्षिक , शालेय पोषण आहार ,वाहतूक नियम, शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय परीक्षा यावर मार्गदर्शन व चर्चा आयोजित केल्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच लक्ष पुढे ठेऊन या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात.
तालुक्यातून पहिला क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वासाडे ,आणि सर्व संचालक तथा शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांच्या समन्वय व परिश्रमामुळे हा क्रमांक आला असून वेळोवेळी जिल्हा व तालुका स्तरातून अधिकारीवर्ग यांचे मिळालेले मार्गदर्शन अतिशय महत्वाचे ठरले. तसेच परिश्रमाने केलेल्या कार्याची फलश्रुती झाल्याची मुख्याध्यापिका सुधाताई वासाडे यांनी मनोगत व्यक्त केले.