विद्यार्थ्यांचे ध्येय मोठे असावे – ठाणेदार राजगुरु

420

एस न्यूज नेटवर्क / सावली 

सावली येथील विमलताई महिला महाविद्यालयात तीन दिवशीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडले. समारोपीय कार्यक्रमाचे उद्रघाटक म्हणुन सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार तर अध्यक्ष म्हणुन रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या शिक्षीका चंदा रायपुरे यांनी उपस्थिती दर्शविली होती.

विद्यार्थ्यांनी आपले मोठे ध्येय मोठे ठेवावे जेणेकरुन पुढील शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही. मोठे अधिकारी होता येणार असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी मंचावर संस्थेचे संचालक फुलझेले, मा. विलसजि यासलवार साहेब् माजी नगराध्यक्ष न.प.सावली, शेतकरी राईस मिलचे अध्यक्ष मोहन गाडेवार, माजी नगराध्यक्ष छत्रपती गेडाम, नगरसेवक सतिश बोम्मावार, नगरसेवक प्रितम गेडाम, नगरसेवक निलम सुरमवार, रोशन बोरकर, नितेश रस्से, महाविद्यालयाचे प्राचार्य पठाण आदि मान्यवर उपस्थित होते.

सावली येथे मागील अनेक वर्षापासुन विमलताई महिला महाविद्यालय सुरळीत सुरु आहे. या महाविद्यालयात ग्रामिण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा या महाविद्यालयात तीन दिवशीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये दि. 18 रोजी विद्यार्थीनीची कबड्डी, खो-खो, गोळाफेक आदी क्रिडा घेण्यात आल्या. तर दि. 19 व 20 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात विद्यार्थीनीनी उत्सफुर्त प्रतिसाद नोंदविला.

कार्यक्रमाचे संचालन राजु दुर्गे, आभार प्रदर्शन प्राचार्य पठाण यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वतीतेसाठी संस्थेचे संचालक यशपाल गोंगले, प्राचार्य पठाण सर ,डॉ.खोब्रागडे सर .नरेंद्र मोटघरे ,दुर्वेश पीसे,नंदू ननावरे,रोहित मेश्राम,सरोज रायपूरे,अमित मेश्राम,आनंद तळसे,अक्षय गेडाम कमलकर ठाकूर,राकेश पातले यांनी कर्यक्रम यशस्वी करिता प्रयत्न केले,