शिवप्रतिष्ठान युवा मंडळ उसेगाव च्या वतीने ३९४ वा शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

217

 

*विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

एस न्यूज नेटवर्क/सावली  :- सौरव गोहने 

सावली तालुक्यातील उसेगाव येथे एक गांव एक शिवजयंती या संकल्पनेचा विचार करुन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. लेज़िम व भजनात मनमग्न होऊन शिवजन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेची सुरुवात हनुमान मंदिरापासून संपूर्ण गांव फेरी करुन पुन्हा हनुमान मंदिरासमोर सांगता करण्यात आली. त्या नंतर

या शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच सुनिल पाल, हे होते तर उद्घाटक बंडू आभारे सहउद्घाटक विलास मुसद्दीवार यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून देवाजी भोयर, भास्कर उरकुळे, अरुण पाल, विलास सहारे, दिपीका किनेकर, सुनंदा मेश्राम, श्रीमती गोहने, रामदास गोहने, राजु ठुसे, श्रीकृष्णा कन्नाके, संतोष बोरकुटे, व गावातील प्रतिष्ठित नागरिक मंचावर उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे संचालन महेश उरकुळे, गुरुदास भोयर प्रास्ताविक राहुल सहारे, तर आभार अनुभव पाल यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी करीता शिवप्रतिष्ठान युवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी व गावकरी मंडळींनी सहकार्य करुन पार पाडले.