ग्रामीण भागातील CA कमलेश अढिया ची गरुडझेप

274

सावली तालुक्यातील पाथरीसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेल्या CA कमलेश अढिया यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर दुबईपर्यंत यशाची भक्कम झेप घेत परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

 

कमलेश अढिया यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले. त्यानंतर त्यांनी नवरगाव येथील नवभारत विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी सिंदेवाही आणि नंतर चंद्रपूर येथे शिक्षण घेतले. ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

सध्या ते Ernst & Young Dubai या जगप्रसिद्ध Big 4 Consulting Firm मध्ये कार्यरत असून त्यांना नुकतेच “Partner” म्हणून पदोन्नती मिळाली आहे. ही केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण ग्रामीण भागासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

त्यांचे वडील राजेंद्रजी अढिया हे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळखले जातात. कुटुंबातील संस्कार, शिक्षणावरील निष्ठा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कमलेश अढिया यांनी हे यश संपादन केले आहे.

आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रबळ इच्छाशक्ती, सातत्य आणि मेहनत यांच्या जोरावर यश संपादन करता येते, हे CA कमलेश अढिया यांच्या यशातून स्पष्ट होते.