*विद्याकीय प्रशासनाचा घेतला आढावा. पारडी येथील जि.प शाळेचीही केली पाहणी.*
सावली ०६/१२/२०२४ :
सावली तालुक्यातील पारडी येथे ५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेतील ११४ विद्यार्थ्यांना विष बाधा झाली. सर्व बाधित विद्यार्थ्यांना ५ तारखेला रात्रीच सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. आज सकाळीच (दि.६/१२/२४) रोजी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी सावली येथील ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. या वेळी माजी आमदार देशकर यांनी डॉक्टरांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. सोबतच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधत त्यांना धीर दिला. या वेळी माजी आमदार प्रा. देशकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सोबत दूरध्वनी द्वारे संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली.

मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वैद्यकीय प्रशासनाला सूचना देत सर्व यंत्रणेला योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून सर्वांच्या प्रकृतीत सुधार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

त्यानंतर पारडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत माजी आमदार प्रा. अतुल देशकर शाळेची पाहणी केली. या वेळी त्याठिकाणी चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत परिस्थिती जाणून घेतली. या वेळी गावकऱ्यांसोबत ही माजी आमदार देशकर यांनी संवाद साधला.

या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, संवर्ग विकास अधिकारी श्री. वासनिक, सावली भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुन भोयर, महामंत्री सतीश बोमावार, जेष्ठ नेते प्रकाश गड्डमवार, माजी जि.प सभापती संतोष तंगडपाल्लीवार, सावली शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी शहराचे अध्यक्ष प्रा. अशोकराव सालोटकर, माजी पं.स सभापती छाया शेंडे, माजी उपसभापती रवींद्र बोलिवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नीतिन कारडे, नगरसेविका सौ. निलम सुरमवार, नगरसेविका शारदा गुरनुले, छाया चकबंडलवार, शरद सोनवणे, गौरव संतोषवार, निखिल सुरमवार, प्रसाद जकुलवार, दिलीप जाधव, नामदेव भोयर, बंडू वार, रोशन अंसारी, दीपक शेंडे यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








