घोरपडीची शिकार करून विल्हेवाट लावण्याऱ्या तीन आरोपींना अटक

214

*राजुरा वन कर्मचार्याची कारवाई*
राजुरा(प्रतिनिधी)-

राजुरा वनपरिक्षेत्राच्या सुमठाणा नियतक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भेदोडा येथे घोरपड या दुर्मिळ वन्यप्राणी पकडून आणून त्याच्या मांसाची विल्हेवाट लावणाऱ्या तीन आरोपीना मुद्देमालासह राजुरा येथील वन कर्मचाऱयांनी धाड टाकून अटक अटक केली आहे.

भेदोडा येथे काही इसम घोरपड हे वन्यप्राणी आणल्याची गुप्त माहिती राजुराचे क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते यांना मिळाली लगेच याची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱयांना सांगितले उपविभागीय वन अधिकारी पवनकुमार जोंग ,वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांच्या मार्गदर्शनात अधिनस्थ वनकर्मचारी,वनमजुर यांना घेऊन भेदोडा येथे घटनास्थळी सापळा रचून धाड टाकली यावेळी व्यंकटी रामळू अनमूलवार हा घोरपडीचे मांसाचे तुकडे करीत होता तर संतोष नागुलवार पुरुषोत्तम हा बाजूला उभा होता यावेळी अधिक चौकशी केली असता शेतात घोरपड मिळाली म्हणून तिला पकडून भाजी करण्याचे उद्देशाने व्यंकटी अनमूलवार याकडे आलो असून मांसाचे विल्हेवाट करीत होतो यात। माझे सोबत पुरुषोत्तम देबतवार असल्याचे सांगितले त्यावरून या तिघांनाही ताब्यात घेऊन राजुरा वन कार्यालयात आले यांचे विरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले यावेळी या आरोपिकडून घोरपडीचे मास,चामडी,सतूर,चाकु जप्त करण्यात असून पुढील तपास उपवनसरक्षक श्वेता बोड्डू ,यांचे मार्गदर्शनात सूरु आहे ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांचे नेतृत्वात क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,वनरक्षक संदीप तोडासे, सुनील गजलवार,पवन मडुलवार,मारोती चाफले,वनमजुर मयूर आत्राम,गंगाधर मोहितकर ,यांनी केली