पिकअप व दुचाकीची आमने सामने धडक. दोन युवक ठार, एक गंभीर .

3323

राजुरा – गडचांदूर मार्गावरील घटना.

 

गडचांदूर वरून राजुऱ्याकडे येत असलेल्या पिकअपने गडचांदूरकडे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली .यात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला .ही घटना आज दिनांक 20 जून ला राजुरा -गडचांदुर मार्गावर दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृतकामध्ये सौरभ मारुती बावणे,18वर्षे, चिचबोडी व नैतिक दिलीप लाटेवार ,16 वर्षे वरूर रोड यांचा समावेश आहे .तर यश भीमराव रामटेके (18 वर्षे )वरूर रोड हा गंभीर जखमी झाला आहे.

 

आज दिनांक 20 जून ला दुपारच्या सुमारास गडचांदूर कडून राजुराकडे येणारे पिकप क्रमांक 34 बी झेड 4957 राजुराकडे येत होती
याच दरम्यान विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच 34 बीसी 6355 या वाहनावर तीन युवक होते, हे तिघेही दुचाकीने गडचांदूरकडे जात होते. खामोना जवळील मार्गावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी आणि पिकपची जोरदार आमने-सामने धडक झाली. यात दोन युवक जागीच ठार झाले. तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भयानक होती की यातील दुचाकी वरील एक युवक सरळ पिकप चा ट्रॉलीमध्ये उसळून पडला. गंभीर युवकाला उपचारासाठी चंद्रपूर येथे येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी हे घटनास्थळी दाखल झाले . मृतदेह व जखमेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयासमोर नागरिकांनी गर्दी केली काही काळासाठी तणाव निर्माण झालेला होता.

 

दिवसेंदिवस गडचांदूर- राजुरा महामार्गावरील अपघातात प्रचंड वाढ झालेली आहे. वाहनांच्या गतीवर नियंत्रण नसल्यामुळे सुसाट वेगाने वाहने धावतात यामुळे अपघात करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, उप पोलीस निरीक्षक पांडुरंग हाके वाहतूक शाखेचे चंपत बंडी,पवार अधिक तपास करीत आहे.